Xiaomi Mix Flip: सॅमसंगला टक्कर देण्यासाठी शाओमीनं आणलाय फ्लिप स्मार्टफोन, मिळणार तगडे फीचर्स!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Xiaomi Mix Flip: सॅमसंगला टक्कर देण्यासाठी शाओमीनं आणलाय फ्लिप स्मार्टफोन, मिळणार तगडे फीचर्स!

Xiaomi Mix Flip: सॅमसंगला टक्कर देण्यासाठी शाओमीनं आणलाय फ्लिप स्मार्टफोन, मिळणार तगडे फीचर्स!

Jul 22, 2024 06:08 PM IST

Xiaomi Mix Flip Launched: शाओमीने त्यांचा प्लिप स्मार्टफोन शाओमी मिक्स प्लिप १९ जुलै रोजी चीनमध्ये लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर अनेक स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देईल, असा कंपनीचा विश्वास आहे.

शाओमी मिक्स फ्लिप हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे.
शाओमी मिक्स फ्लिप हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. (Xiaomi)

Xiaomi Mix Flip Launched In China: शाओमीने त्यांचा नवा स्मार्टफोन शाओमी मिक्स फ्लिप चीनमध्ये लॉन्च केला आणि क्लॅमशेल फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रवेश केला. लॉन्च इव्हेंटमध्ये शाओमी मिक्स फोल्ड ४ आणि रेडमी के ७० अल्ट्रा यांचाही समावेश होता. मिक्स फ्लिप क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ चिपसेटवर काम करते आणि यात ४ हजार ७८० एमएएच क्षमता असलेली बॅटरी आहे, जी ६७ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात ४.०१ इंचाची १.५ के फ्लेक्सिबल एमोलेड कव्हर स्क्रीन आणि ड्युअल रिअर कॅमेरा सिस्टिम देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर आधारित शाओमीच्या हायपरओएसवर चालतो.

शाओमी मिक्स फ्लिप: किंमत आणि उपलब्धता

शाओमी मिक्स फ्लिप १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ५ हजार ९९९ चीनी युआन (अंदाजे ६९००० रुपये) पासून सुरू होते. १२ जीबी + ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ६ हजार ४९९ चीनी युआन (सुमारे ७४ हजार ८०० रुपये) आहे. तर, १६ जीबी + १ टीबी व्हेरिएंटची किंमत ७ हजार २९९ चीनी युआन (सुमारे ८४,००० रुपये) आहे. हा स्मार्टफोन काळा, जांभळा आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध आहे. ५१२ जीबी मॉडेलसाठी विशेष "फिनिक्स फेदर फायबर एडिशन" उपलब्ध आहे. हा फोन चीनमध्ये २३ जुलैपासून स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ७.३० वाजता) विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि सध्या शाओमीच्या अधिकृत चायना वेबसाइटवर प्री-सेलसाठी उपलब्ध आहे.

शाओमी मिक्स फ्लिप: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

मिक्स फ्लिपमध्ये ६.८६ इंचाचा 1.5K फ्लेक्सिबल एमोलेड इनर डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कव्हर स्क्रीनमध्ये ४.०१ इंचाचा 1.5K फ्लेक्सिबल एमोलेड पॅनेल देखील वापरला आहे. मिक्स फ्लिपमध्ये स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर आणि एड्रेनो ७५० जीपीयू आहे, ज्यात १६ जीबी पर्यंत LPPDDR5X रॅम आणि १ टीबीपर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज आहे. ड्युअल रियर कॅमेऱ्यांमध्ये ५० एमपी लाइट फ्यूजन ८०० प्रायमरी सेन्सर आणि ५० एमपी ओमनीव्हिजन OV60A40 सेन्सर सह २ एक्स ऑप्टिकल झूम प्रदान करणारा टेलिफोटो लेन्स आहे. फ्रंट कॅमेऱ्यात ३२ एमपी ओव्ही ३२ बी सेन्सर आहे.

फोनच्या कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 5G, ड्युअल 4G व्हीओएलटीई, वाय-फाय 6E, ब्लूटूथ ५.४ जीपीएस, गॅलिलिओ, ग्लोनस, क्यूझेडएसएस, एनएव्हीआयसी, यूएसबी टाइप-सी २ जेन १ आणि एनएफसी यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अतिरिक्त सुरक्षेसाठी साइड- माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला. या फोनचे वजन १९२ ग्रॅम आहे.

Whats_app_banner