Xiaomi first electric car: चिनी कंपनी शाओमीची पहिली इलेक्ट्रिक कार एसयू ७ जगाची वाट पाहत आहे. याची झलक कंपनीने अनेक वेळा दाखवली आहे. तसेच त्याच्या लाँचिंगशी संबंधित बातम्याही अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, ही कार भारतात कधी लॉन्च होईल, याबाबत कोणतीही बातमी समोर आली नव्हती. मात्र, आता ही कार भारतात दाखल झाली असून कंपनीच्या बंगळुरू येथे दहाव्या वर्धापन दिनानिमित्त डेमो मॉडेल म्हणून ठेवण्यात आले आहे.
शाओमीची एसयू ७ इलेक्ट्रिक कार चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. तर, त्याला ७० हजारांहून अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. कंपनीने दावा केला आहे की, ही कार सिंगल चार्जवर ८०० किमीपर्यंत रेंज देईल. ही इलेक्ट्रिक कार थेट टेस्ला आणि बीवायडी इलेक्ट्रिक कारला टक्कर देणार आहे. शाओमी एसयू ७ ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक कार आहे, जी कंपनी नुकतीच भारतात प्रदर्शित करणार आहे. सध्या याच्या लाँचिंगबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
शाओमी एसयू ७ ही प्रीमियम इलेक्ट्रिक सेडान कार असून त्याची लांबी ५ मीटर आहे. तर, टॉप-एंड व्हेरियंटमध्ये ड्युअल मोटर सेटअप आहे. एवढेच नाही तर या कारमध्ये १०१ किलोवॅटचा मोठा किलिन बॅटरी पॅक आहे. ही कार फुल चार्ज केल्यावर सुमारे ८०० किलोमीटरचा पल्ला गाठते. ड्युअल मोटर सेटअपसह ही कार ६०० बीएचपीची जास्तीत जास्त पॉवर जनरेट करेल. तर, ही इलेक्ट्रिक कार भारतात बीवायडी सीलला टक्कर देणार आहे.
शाओमीच्या भारतात आगमनानंतर भविष्यात तो भारतीय बाजारपेठेत लाँच केला जाऊ शकतो, असेही ठरविण्यात आले आहे. भारतीय बाजारात त्याची टक्कर ह्युंदाई आयनिक ५ आणि बीवायडी सील सारख्या मॉडेल्सशी होणार आहे. याची एक्स शोरूम किंमत ४० लाख रुपयांच्या आसपास असेल. कंपनीने मार्च २०२४ मध्ये या सेडानची डिलिव्हरी सुरू केली होती. या वर्षाच्या अखेरपर्यंत १ लाख युनिट्स डिलिव्हरी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.