Budget Smartphones: चीनचा टेक ब्रँड शाओमीने आपल्या रेडमी लाइनअपमधील नवीन बजेट डिव्हाइस रेडमी १४ सी लॉन्च केला आहे. रेडमी १३ सीचा उत्तराधिकारी म्हणून या डिव्हाइसचे मार्केटिंग करण्यात आले आहे. या फोनमध्ये ५० एमपी कॅमेरा सेटअप आणि शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन हायपरओएससह अँड्रॉइड १४ वर चालतो. रेडमी १४ सी 5G हा फोन ई- कॉमर्स साइट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.
कंपनीने हा फोन अशा ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे, ज्यांचे बजेट कमी आहे. पण ते चांगल्या फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात आहेत. या फोनमध्ये प्रीमियम बॅक फिनिश डिझाइनव्यतिरिक्त ६.८८ इंचाचा मोठा डिस्प्ले मिळत आहे. 5G कनेक्टिव्हिटीमुळे ग्राहकांना लेटेस्ट इंटरनेट स्पीड इनोव्हेशनचा फायदा मिळणार आहे. या फोनसोबत बॉक्समध्ये ३३ वॅट चार्जिंग सपोर्ट असलेला चार्जरही उपलब्ध आहे. याशिवाय, हा फोन १८ वॅट चार्जिंगला सपोर्ट करतो. कंपनी त्याला दोन प्रमुख अँड्रॉइड अपडेट देणार आहे.
नव्या बजेट स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह ६.८८ इंचाचा डिस्प्ले असून हा सेगमेंटमधील सर्वात मोठा १२० हर्ट्झ डिस्प्ले असल्याचा कंपनीचा दावा आहे. याशिवाय फोनला टीयूव्ही लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन मिळाले असून याच्या फ्लिकर-फ्री स्क्रीनमुळे डोळ्यांवर ताण येणार नाही. चांगल्या मल्टीटास्किंग परफॉर्मन्ससाठी, यात 4 एनएम प्रक्रियेवर आधारित क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट आहे आणि हायपरओएस मिळतो.
रेडमी १३ सी 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे आणि ५० एमपी प्रायमरी कॅमेरा आहे. यात खास एआय कॅमेरा फीचर्ससोबतच अनेक मोड आणि फिल्टर्सचाही समावेश आहे.
५१६० एमएएच क्षमतेच्या या मोठ्या बॅटरीला १८ वॅट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन स्टारलाइट ब्लू, स्टारडस्ट पर्पल आणि स्टारगेज ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे आणि ६ जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. तर, आणि ८ जीबी रॅम/ २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी आहे.
हा फोन १० जानेवारीपासून सुरू होईल आणि कंपनीच्या वेबसाइटव्यतिरिक्त फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि शाओमी रिटेल स्टोअरमधून खरेदी केला जाऊ शकतो.
संबंधित बातम्या