Xiaomi vs Samsung: अँड्रॉइड स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात वेगळीच छाप सोडली आहे. बजेट स्मार्टफोनपासून ते टॉप मॉडेलपर्यंत सॅमसंगचे फोन बाजारात उपलब्ध आहेत. सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा हा कंपनीचा टॉप-एंड स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी शाओमीने त्यांचा शाओमी १४ अल्ट्रा बाजारात आणला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
शाओमी १४ अल्ट्रामध्ये ६.७ इंचाचा एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आणि रिझोल्यूशन १४४० बाय ३२०० पिक्सेल आहे. पॅनेल ३००० निट्स पीक ब्राइटनेस तसेच एचडीआर १०+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट करते. दुसरीकडे, सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रामध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.८ इंचाचा क्यूएचडी+ डायनॅमिक एमोलेड २ एक्स डिस्प्ले मिळत आहे.
शाओमी १४ अल्ट्रा मध्ये १६ जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512 जीबी पर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज आहे. दरम्यान, सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रामध्ये १२ जीबी LPDDR5X रॅम आणि १ टीबी पर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज मिळते.
शाओमी १४ अल्ट्रा: शाओमी १४ अल्ट्राच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप मिळत आहे, ज्यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ५० मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा आणि ५० मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ५० एमपी पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४: या फोनमध्ये अल्ट्रामध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे ज्यात २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, ५ एक्स ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सल कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटमध्ये १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला.
शाओमी १४ अल्ट्रा: शाओमी १४ अल्ट्रामध्ये ५ हजार एमएएच बॅटरी आहे, जी ९० वॉट फास्ट चार्जिंग (वायर्ड) आणि ५० वॉट फास्ट चार्जिंग (वायरलेस) सपोर्ट करते. यात १० वॉट रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसपोर्ट देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४: या फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंग (वायर्ड) आणि १५ वॉट फास्ट चार्जिंग (वायरलेस) सह ५ हजार एमएएच बॅटरी देण्यात आली. गॅलेक्सी एस 24 अल्ट्रामध्ये 4.5 वॉट रिव्हर्स वायरलेस चार्जिंग फीचर देखील देण्यात आले आहे.
शाओमी 14 अल्ट्रा: शाओमीच्या १४ अल्ट्राच्या १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा: सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्राच्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १ लाख २९ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते आणि 1 टीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १ लाख ५९ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहे.