Xiaomi 14 Price and Features: चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचा भारतात मोठा युजरबेस असून मार्केट शेअरच्या बाबतीतही कंपनी इतरांपेक्षा पुढे आहे. कंपनीचा प्रीमियम फ्लॅगशिप फोन शाओमी १४ सर्वोत्कृष्ट कॅमेरा सेटअपसह येतो. या स्मार्टफोनवर ग्राहकांना १०,००० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात असून हा डील मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे.
शाओमी १४ एक प्रीमियम डिव्हाइस आहे आणि यात हाय-रिफ्रेश रेटसह 1.5K रिझोल्यूशनसह मोठा डिस्प्ले आहे. फ्लॅगशिप परफॉर्मन्स असलेल्या प्रोसेसरव्यतिरिक्त कंपनी या फोनमध्ये हायपरओएस देत आहे. ९० वॅट फास्ट चार्जिंगव्यतिरिक्त हा फोन ५० वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.
१४ ला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर ६९ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. ही किंमत १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची आहे. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने पेमेंट केल्यास १० हजार रुपयांपर्यंत मोठी सूट दिली जात आहे. जुना फोन एक्सचेंज केल्यास ग्राहकांना ३०हजार ८०० रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. एक्सचेंजमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल. शाओमीचा हा फोन ब्लॅक, व्हाईट आणि जेड ग्रीन अशा तीन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे.
शाओमी फोनमध्ये डॉल्बी व्हिजनसह ६.३६ इंचाचा एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३००० नाइट्सची पीक ब्राइटनेस आहे. यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 (4 एनएम) प्रोसेसरसह दमदार परफॉर्मन्स देण्यात आला आहे आणि बॅक पॅनेलवर ५० मेगापिक्सल आणि ५० मेगापिक्लस टेलिफोटो लेन्स आणि ५० मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी शाओमी १४ मध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ४ हजार ६१० एमएएच बॅटरी बॅटरीचा समावेश आहे. फोनमध्ये १० वॅट रिव्हर्स वायरलेस फास्ट चार्जिंग देखील देण्यात आले.
संबंधित बातम्या