Xiaomi 14 series launched in India: अनेक आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर शाओमी १४ सीरिज (Xiaomi 14 series) भारतात लॉन्च झाली. शाओमी १४ सीरिजमध्ये शाओमी १४ अल्ट्रा (Xiaomi 14 Ultra) आणि शाओमी १४ (Xiaomi 14) या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. शाओमी भारतात फक्त बेस स्मार्टफोन लॉन्च करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, कंपनीने आपले फ्लॅगशिप मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतरवले. दरम्यान, शाओमी १४ सीरिजमधील स्मार्टफोनमधील फीचर्स आणि किंमतीबाबत जाणून घेऊयात.
शाओमी १४ अल्ट्रा या टॉप-एंड स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आणि १४४० बाय ३२०० पिक्सल रिझोल्यूशनअसलेला ६.७ इंचाचा एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले आहे. पॅनेल ३००० निट्स पीक ब्राइटनेस तसेच एचडीआर १०+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट करते. शाओमी १४ अल्ट्रामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनी भारतात एक सिंगल व्हेरियंट सादर करत आहे, ज्यात १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज आहे.
शाओमी १४ अल्ट्राच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि ५० मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा मिळत आहे. तर, व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली, जी ९० वॅट फास्ट चार्जिंग (वायर्ड) आणि ५० वॅट फास्ट चार्जिंग (वायरलेस) सपोर्ट करते.
शाओमी १४ मध्ये ६.३६ इंचाचा एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये फ्लॅगशिप शाओमी १४ अल्ट्रा सारखेच प्रोसेसर आहे. परंतु, यात १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळत आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर आधारित शाओमी हायपरओएसवर चालतात. या फोनमध्ये ४ हजार ६१० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली, जी ९० वॅट फास्ट चार्जिंग (वायर्ड) आणि ५० वॅट फास्ट चार्जिंग (वायरलेस) सपोर्ट करते.
शाओमी १४ अल्ट्राच्या १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. तर, शाओमी १४ च्या १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 69 हजार 999 रुपये आहे.
संबंधित बातम्या