Best Selfie Camera Phones: चीनचा टेक ब्रँड शाओमी दमदार परफॉर्मन्स असलेले अनेक स्मार्टफोन ऑफर करत आहे. दमदार सेल्फी कॅमेरा असलेला फोन शोधत असाल तर, शाओमी १४ सीआयव्हीआयवर जबरदस्त सूट मिळत आहे. या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप आणि ३२+३२ एमपी फ्रंट कॅमेरा सेन्सर आहेत.
शाओमीचा हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विशेष सवलतीसह लिस्ट करण्यात आला असून तो खरेदी करण्यासाठी निवडक बँक कार्ड भरल्यास अतिरिक्त सूट दिली जात आहे. शाओमी १४ सिव्ही हा एक प्रीमियम डिव्हाइस आहे आणि लीका प्रोफेशनल पोर्ट्रेट्ससारख्या शक्तिशाली बिल्ड-क्वालिटी आणि कॅमेरा फीचर्ससह येतो. या फोनमध्ये मिळणारा कॅमेरा उत्कृष्ट आहे.
शाओमी १४ सिव्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ३९ हजार ९९९ रुपयांच्या सवलतीच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. या फोनसाठी सर्व बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास १००० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, इतर निवडक बँक कार्डवरून पेमेंट केल्यास अतिरिक्त सूट ही मिळते. ग्राहक इच्छित असल्यास विशेष एक्सचेंज डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकतात.
निवडक मॉडेल्सवर एक्स्चेंजवर १००० रुपयांचा अतिरिक्त बोनस दिला जात आहे. याशिवाय २५,७०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंट मिळू शकतो. या डिस्काऊंटची किंमत जुन्या फोनचे मॉडेल आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून असेल. हे अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
शाओमी १४ सिव्हीमध्ये ६.५५ इंचाचा क्वाड-कर्व्ड 1.5K एमोलेड डिस्प्ले आहे, ज्यात ए १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १०+ आणि डॉल्बी व्हिजन आहे. याव्यतिरिक्त, स्मार्टफोन गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ सह संरक्षित आहे.
या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर देण्यात आला असून यात ट्रिपल कॅमेरा सेटअप असून ५० एमपी टेलीफोटो लेन्स सह ५० एमपी मुख्य कॅमेरा आणि बॅक पॅनेलवर ५० एमपी अल्ट्रावाइड सेन्सर आहे. यात ३२ एमपी मेन आणि ३२ एमपी वाइड सेन्सरसह ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये ४ हजार ७०० एमएएच बॅटरी देण्यात आली, जी ६७ वॅट चार्जिंगला सपोर्ट करते. शाओमी १४ सिव्ही क्रूझ ब्लू, मॅचा ग्रीन आणि शॅडो ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, शाओमीची अधिकृत वेबसाइट आणि इतर रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा फोन २० जून २०२४ पासून विक्रीसाठी उपलब्ध आहे.
संबंधित बातम्या