Xiaomi 14 CIVI India Launch Date: शाओमी १४ सीआयव्हीआय गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. या स्मार्टफोनबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसवल्या जात आहेत. मात्र, आता अखेर कंपनीने शाओमी १४ सिव्ही स्मार्टफोनच्या भारतातील लॉन्चिंगची तारीख निश्चित केली आहे. शाओमी १४ सीआयव्हीआय येत्या १२ जून २०२४ रोजी भारतात दाखल होत आहे. या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या संभाव्य फीचर्सबाबत जाणून घेऊ.
नुकतीच फ्लिपकार्ट आणि mi.com वर मायक्रोसाइट तयार करून शाओमी १४ सीआयव्हीआयच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख जाहीर केली. या वेबसाईटवर आगामी स्मार्टफोनची काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स, प्रामुख्याने कॅमेरा डिटेल्स दाखवण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन प्रीमियम शाओमी १४ सीरिजचा भाग असेल. उत्कृष्ट कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर आपल्याला १२ जून २०२४ रोजी शाओमी १४ सीआयव्हीआय लॉन्च होण्याची प्रतीक्षा करावी लागेल.
शाओमी १४ सीआयव्हीआय स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, यात २५ एमएम सिनेमॅटिक एचडीआर सपोर्टसह ५० एमपी सुमिलक्स लेन्स, २ एक्स ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सल पोर्ट्रेट टेलिफोटो लेन्स आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा असेल. याव्यतिरिक्त, शाओमी १४ सीआयव्हीआय ड्युअल फ्रंट कॅमेरा सपोर्ट करेल, ज्यात ३२ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे.
शाओमी १४ सीआयव्हीआयमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 1.5K रिझोल्यूशन कर्व्ड एमोलेड डिस्प्ले असेल. याव्यतिरिक्त, सुधारित पाहण्याच्या अनुभवासाठी हे एचडीआर १० प्लस आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट देईल. शाओमी १४ सीआयव्हीआयमध्ये ४७०० एमएएच क्षमतेची बॅटरी असेल, जी ६७ वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल. शाओमी १४ सीआयव्हीआयची किंमत आणि अधिक तपशील १२ जून २०२४ रोजी होणाऱ्या अधिकृत घोषणेदरम्यान उघड केले जातील. हा स्मार्टफोन बाजारात दाखल झाल्यानंतर धुमाकूळ घालेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या