Xiaomi 14 and Xiaomi 14 Ultra: स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी येत्या ७ मार्चला त्यांची शाओमी १४ सीरिज मार्च महिन्यात लॉन्च होत आहे. या सीरिजमध्ये शाओमी १४ आणि शाओमी १४ अल्ट्रा या दोन फोनचा समावेश आहे. हा फोन वनप्लस आणि सॅमसंग कंपनीच्या स्मार्टफोनला टक्कर देईल. दरम्यान, शाओमी १४ सीरिजच्या स्मार्टफोनमधील फीचर्स आणि किंमतीबाबत जाणून घेऊयात.
शाओमी १४ आणि शाओमी अल्ट्रा येत्या मार्चला भारतीय बाजारात दाखल होत आहेत. या दोन्ही स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबत कंपनीने अधिकृतरित्या तारीख जाहीर केली आहे.या स्मार्टफोनची किंमत ७५ हजारांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.
शाओमी १४ आणि शाओमी १४ अल्ट्रा दोन्ही स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 मोबाइल प्लॅटफॉर्मसह येतील. यामध्ये Leica Summilux लेन्स मिळेल. शाओमी १४ मध्ये ६.३६ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे.सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. या फोनमध्ये ४ हजार ६१० एमएएच क्षमता असलेलीची बॅटरी मिळत आहे. या फोनची खासियत म्हणजे हा फोन अवघ्या १० मिनिटात ५० टक्के चार्ज होतो.
शाओमी १४ अल्ट्रामध्ये ग्राहकांना ६.७३ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तसेच तसेच ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. शाओमी अल्ट्रामध्ये ५ हजार ३०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.