मराठी बातम्या  /  business  /  Wrong UPI id : चूकीच्या यूपीआय आयडीवर पैसे ट्रान्सफर झाले ? अशी दुरुस्त करा चूक
UPI HT
UPI HT

Wrong UPI id : चूकीच्या यूपीआय आयडीवर पैसे ट्रान्सफर झाले ? अशी दुरुस्त करा चूक

23 January 2023, 17:55 ISTKulkarni Rutuja Sudeep

wrong upi id : चूकीच्या यूपीआय आयडीवर पैसे हस्तांतरीत केल्यावर पहिल्यांदा यूजर्सने पेमेंट सिस्टिमकडे तक्रार नोंदवावी.

Wrong UPI id : जगात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तंत्रज्ञानाने आपला वेळ वाचवला आहे तर अनेकदा नुकसानही केले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ने भारतीय डिजिटल पेमेंट प्रणालीने संपूर्ण डिजीटल पेमेंट सिस्टिमला बदलून टाकले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लोक त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून कधीही थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. तर त्यासाठी यूपीआय प्रणाली देखील सुरक्षित आहे. पैसे डेबिट झाल्यानंतर व्यवहारात अडचणी येणे किंवा लोकांना यूपीआय फसवणुकीसाठी असुरक्षित बनवणे यासारख्या डिजिटल गेटवेमध्ये देखील अनेकदा त्रुटी असतात. लोकांना भेडसावणारी अशीच एक मोठी समस्या म्हणजे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) मोबाईल नंबर किंवा QR कोड वापरून बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. वापरकर्ते भीमअॅपद्वारे किंवा गुगल पे, फोन पे आणि इतर यूपीआय सेवा प्रदात्यांद्वारे यूपीआय पेमेंट करू शकतात.

तथापि, सर्व सुरक्षा वैशिष्ट्ये आणि सूचना असूनही, यूजर्स पेमेंट करणाऱ्या व्यक्तींचा फोन नंबर किंवा क्यूआर कोड दोनदा तपासण्याचा विचार करत नाहीत. ही समस्या सामान्य असली तरीही चिंताजनक आहे. कारण यूपीआय व्यवहाराद्वारे पैसे हस्तांतरित केल्यानंतर ते परत केले जाऊ शकत नाहीत. पण यावरही एक तोडगा आहे.

अशी सुधारा चूक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूजर्सने पहिल्यांदा पेमेंट सेवा प्रदात्यासोबत अनवधानाने व्यवहार केल्याची तक्रार केली पाहिजे. गुगल पे , फोन पे, पेटीएम किंवा यूपीआय अॅपच्या ग्राहक सेवा सहाय्यता केंद्रात संबंधित तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. ग्राहकांना मदत देण्यासाठी सेवा प्रदात्यांची स्वतःची यंत्रणा असते. तुम्ही तुमची समस्या फ्लॅग करू शकता आणि परतावा मागू शकता.

या पद्धतीनेही तक्रार दाखल करा

- एनपीसीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवा

- बँकेशी संपर्क साधा

- बँकिंग लोकपालशी संपर्क साधा. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणाऱ्या डिजिटल व्यवहारांसाठी RBI ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याची लोकपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

विभाग