Worth Investment Trading : वर्थ इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंगने बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीच्या वतीने पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर १.५ समभाग बोनस देण्यात येणार आहे. कंपनीच्या शेअरची किंमत ५० रुपयांपेक्षा कमी आहे.
कंपनीनं शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार १ रुपया अंकित मूल्य असलेल्या शेअरवर १.५ शेअर्स बोनस म्हणून दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येक २ शेअरमागे पात्र गुंतवणूकदारांना ३ शेअर्स मिळतील. त्यासाठी १४ नोव्हेंबर २०२४ ही तारीख बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट म्हणून घोषित करण्यात आली आहे. तुम्हाला बोनस शेअरचा फायदा घ्यायचा असेल तर रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी तुम्हाला कंपनीचे शेअर्स खरेदी करावे लागतील.
जुलै महिन्यात वर्थ इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सचे विभाजन करण्यात आले होते. बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीचे शेअर्स १० भागांमध्ये विभागले गेले होते. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपयापर्यंत खाली आली आहे.
वर्थ इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंगचा शेअर गुरुवारी जवळपास १ टक्क्यांनी वधारून ३४.६४ रुपयांवर बंद झाला. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांचा काळ गुंतवणूकदारांसाठी त्या दृष्टीने चांगला राहिला नाही. या काळात शेअरच्या किंमतीत १.५५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
गेल्या महिन्याभराबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १२ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या काळात हा शेअर नफा वसुलीचा बळी ठरला आहे.