World Senior Citizens Day : ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक आयुष्य सुसह्य करणारे ५ सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय-world senior citizens day 2024 5 top investment options for older adults ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  World Senior Citizens Day : ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक आयुष्य सुसह्य करणारे ५ सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय

World Senior Citizens Day : ज्येष्ठ नागरिकांचे आर्थिक आयुष्य सुसह्य करणारे ५ सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय

Aug 21, 2024 11:07 AM IST

Investment options for senior citizens : ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारी सर्वात मोठी अडचण असते ती आर्थिक सुरक्षेची. आजच्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम गुंतवणूक पर्यायांची माहिती घेऊ.

World Senior Citizens Day 2024: Here are top five investment options for senior citizens.
World Senior Citizens Day 2024: Here are top five investment options for senior citizens.

World Senior Citizens Day 2024 : निवृत्तीनंतर सुखी आणि तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर वेळीच शहाणपणानं गुंतवणूक करणं आणि त्यानुसार बचत करणं महत्त्वाचं ठरतं. संचित निधीतून नियमित उत्पन्न मिळावं यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपली गुंतवणुकीची साधनं समजूतदारपणे निवडणं आवश्यक आहे. 

बहुतेक वृद्ध लोक त्यांचे कष्टानं कमावलेले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जुनाट पद्धतींचा वापर करतात. त्यातून चांगला परतावा मिळतोच असं नाही. ज्येष्ठ नागरिक दिनाच्या (Senior Citizen Day) निमित्तानं वृद्धांसाठी जास्तीत जास्त सुरक्षित, चांगला परतावा देणाऱ्या आणि कमीत कमी वेळात हातात पैसा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांची माहिती घेणं औचित्याचं ठरेल.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

ही ६० वर्षांवरील लोकांसाठी सरकार पुरस्कृत बचत योजना आहे. भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही योजना कुठल्याही मोठ्या जोखमीशिवाय जास्त परतावा मिळवून देणारी योजना आहे. ही योजना बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा (FD) जास्त व्याज दर देते. या योजनेचा लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे. मात्र, पहिल्या वर्षानंतर दंड म्हणून काही रक्कम भरून व्यक्ती आपले पैसे काढू शकतात. अधिक परतावा मिळवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना चांगला पर्याय आहे.

पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMS)

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम ही कमी जोखमीची मासिक उत्पन्न योजना आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात भांडवली संरक्षण देखील देते. सेवानिवृत्तीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये व्यक्तींना आर्थिक संरक्षण पुरवते.

ज्येष्ठ नागरिक मुदत ठेव

ही ठेव योजना (Fixed Deposit) कमी जोखीम घेण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय आहे. बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) यांच्याकडं ही एफडी ठेवता येते. सोपी प्रक्रिया, विश्वासार्हता आणि स्थिर परताव्यामुळं हे पर्याय लोकप्रिय आहेत. मुदत ठेवीतील गुंतवणूक सुरक्षित असते, परंतु जमा केलेली रक्कम ठराविक कालावधीसाठी उपलब्ध होत नाही.

म्युच्युअल फंड योजना

जे ज्येष्ठ नागरिक त्यांच्याकडील काही पैसे उच्च परताव्याच्या साधनांमध्ये गुंतवू इच्छितात, ते डेट-ओरिएंटेड म्युच्युअल फंड किंवा हायब्रीड म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकतात. हे गुंतवणुकीचे पर्याय कमी जोखमीमध्ये जास्त परतावा देतात आणि एक चांगली रक्कम गाठीशी उपलब्ध करून देतात.

गोल्ड फंड

गोल्ड फंड हा गुंतवणुकीचा सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे. बदलत्या काळानुसार आणि डिजिटल युगाच्या उदयामुळे ज्येष्ठ नागरिक डिजिटल गोल्ड, गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंडांमध्येही पर्याय निवडू शकतात. या गुंतवणुकीला वयाचा अडसर नाही.

विभाग