First Ethanol Innova Launch : १०० टक्के इथेनाॅलवर आधारित असलेली एमपीव्ही सेगमेंटमध्ये इनोव्हा हायक्राॅस दाखल करणारी पहिली कंपनी बनली आहे. आज कंपनीने बेस्ड माॅडेल दाखल केले आहे. इनोव्हा इलेक्ट्रिक फ्लेक्स - फ्यूएल सर्टिफिकेट्ससह भारत स्टेज ६ वाहनांसह येणारे हे पहिले बेस्ड माॅडेल ठरले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच एका शिखर संम्मेलनात अपकमिंग लाँन्चची घोषणा केली आहे. इनोव्हा माॅडेलचे लाँन्च हे एक चांगले उदाहरण आहे. ज्या कंपन्या बायो फ्यूएल, हायड्रोजनसह इथेनाॅल मिश्रीत फ्लेक्स फ्यूएलसारख्या पर्यायासह गाड्यांचे उत्पादन करतात. या प्रयत्नांचा उद्देश हा महाग इंधन आयात रोखून कार्बन फूटप्रिंट कमी करणे आहे.
इलेक्ट्रिक फ्लेक्स फ्यूएल इनोव्हा हायक्राॅसमध्ये आॅप्शनल फ्यूएलचा पर्याय आहेच पण त्याबरोबर ती इलेक्ट्रिक पावर जनरेट करण्यासही सक्षम ठरेल. याचा अर्थ ही ईव्ही मोडवरही चालू शकेल. इलेक्ट्रिफाईड इनोव्हा हायक्राॅस फ्लेक्स फ्यूएल एक प्रोटोटाईप माॅडेल आहे. जी नव्या एमिशन नाॅर्म्स भारत स्टेज ६ च्या नियमांनुसार अपडेटेड आहे.
संपूर्णपणे टोयोटाच्या प्रकल्पात सुरू झालेली इनोव्हा हायक्राॅस फ्लेक्स फ्यूएल एमपीव्हीवर चालू शकेल. इथेनाॅलला ई १०० ग्रेड दिला आहे. याचा अर्थ ही गाडी संपूर्णपणे आॅप्शनल फ्यूएलवर चालू शकेल. एमपीव्हीमध्ये लिथियम बॅटरी पॅक असणर आहे. यामुळे गाडीला ईव्ही मोडवर चालण्यास मदत होईल. दरम्यान हे नवे व्हेरियंट भारतीय रस्त्यावर कधी दिसेल याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
इनोव्हा हायक्राॅस २.० लीटर ४ सिलेंडर पेट्रोल इंजिनसहित येते. यामुळे १८१ बीएचपी पावर जनरेट केले जाते. ही गाडी प्रति लीटर २३.३४ किमीचं मायलेज देण्यास सक्षम आहे. इंजिनला e CVT ट्रान्समिशनशी कनेक्ट केले आहे.