मराठी बातम्या  /  business  /  Women IPL : इथेही रंगणार अंबानी विरुद्ध अदानीं, महिला आयपीएल टीम खरेदीसाठी दोघे आमनेसामने
Ambani vs Adani_HT
Ambani vs Adani_HT

Women IPL : इथेही रंगणार अंबानी विरुद्ध अदानीं, महिला आयपीएल टीम खरेदीसाठी दोघे आमनेसामने

24 January 2023, 16:24 ISTKulkarni Rutuja Sudeep

Women IPL : व्यावसायिक पातळीवर अदानी विरुद्ध अंबानींचा सामना नेहमीच रंगतो. पण आता क्रिकेटच्या पीचवरही दोन्ही दिग्गज आमने सामने येणार आहेत. २५ जानेवारीला महिला आयपीएलच्या टीमसाठी बोली प्रक्रिया होणार आहे.

Women IPL : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी महिलांच्या क्रिकेट लीग खरेदी करण्याची शक्यता आहे. वास्तविक महिला आयपीएल टीम्सच्या खरेदीसाठी अदानी यांनी रस दाखलला आहे. अदानी समुहाशिवाय टोरेंट ग्रुप, हल्दीराम प्रभूजी, केपरी ग्लोबल, कोटक आणि आदीत्य बिर्ला समुहाने टीम्सच्या खऱेदीसाठी सहमती दर्शवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पीटीआय़ने दिलेल्या वृत्तानुसार, महिला आयपीएलसाठी ३० पेक्षा अधिक कंपन्या पाच कोटी बोलीसाठी तयार आहेत. यात पुरुष आयपीएल टीम्मचा मालकी हक्क असलेल्या १० कंपन्यांचाही समावेश आहे.

मुकेश अंबानी यांची मुंबई इंडियन्सही महिला आयपीएलच्या पाच टीम्सच्या बोली प्रक्रियेत हिस्सा घेणार आहेत. मुंबई इंडियन्सही टीम्स खरेदी करु शकते. याशिवाय राजस्थान राॅयल्स, दिल्ली कॅपिटल आणि कोलकाता नाईट रायडर्सही टीम खरेदी करण्यास उत्सुक आहेत.

प्रत्येक टीम्ससाठी अंदाजे ५०० ते ६०० कोटी रुपयांची बोली लागण्याची शक्यता आहे. २५ जानेवारीला या महिला आयपीएल टीमसाठी बोली प्रक्रिया होणार आहे. पाच टीम्सच्या महिला आयपीएलच्या मॅचेस मुंबईत मार्च महिन्यात खेळवल्या जाणार आहेत.

विभाग