Set top box recharge : सेट टाॅप बाॅक्स रिचार्ज करणाऱ्या महिलेने ८१ हजार रुपये गमावले आहेत. मुंबईत ही घटना घडली आहे. या महिनेने सेट टाॅप बाॅक्स रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा पेमेंट करण्यात तिला काही अडचणी आल्या. म्हणून तिने मदतीसाठी डीटीएचच्या सर्व्हिस प्रोवायडरशी संपर्क साधला. कस्टमर एक्झिक्युटिव्हशी बोलल्यानंतर तिच्या बँक खात्यातून तब्बल ८१ हजार रुपयांची चोरी झाली होती.
एक चूक महागात पडली.
एफपीजेच्या अहवालानुसार, मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर भागात राहणारी ही ४७ वर्षीय महिला आहे. ती सेट टाॅप बाॅक्सच्या आॅनलाईन रिचार्जसह एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होती.महिलेने ५ मार्चला रिचार्जसाठी ९३१ रुपयांचा आॅनलाईन पेमेंट केले. त्यानंतर डीटीएच सेवा सुरु होण्यासाठी वाट पाहत बसली. पण रिचार्जनंतरही त्यांना रिचार्ज कन्फर्म झाल्याचा मेसेज आलाच नाही.
या समस्येचे समाधान करण्यासाठी तिने कस्टमर केअरचा हेल्पलाईन शोधून तिथे फोन केला. पण तिथून कोणीही प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशी एका अनोळख्या व्यक्तीचा फोन आला. त्याने स्वत ची ओळख कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह अशी सांगत संबंधित प्रकरणात मदत करण्याची तयारी दाखवली.
या महिलेला हा खरा एक्झिक्युटिव्ह वाटल्याने तीने आदल्या दिवशी घडलेले सर्व प्रकरण त्याला सांगितले. त्या व्यक्तिने महिलेला मोबाईलवर रिमोट अॅक्सेस अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. तिनेही ते डाऊनलोड केले. हे अॅप अनेबल केल्यानंतर तिला ओटीपी मिळू लागले आणि अन आॅथराईज्ड ट्रॅन्झॅक्शनसाठी मेसेजेस मिळायला लागले. तोपर्यंत त्या महिलेला ८१ हजार रुपयांचा गंडा घातला गेला होता.
आॅनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिस स्थानकात तक्रार केली. पोलीसांनी एफआयआर दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
स्कॅमरने सांगितली खोटी ओळख
महिलेने ज्या फोनवर फोन केला होता तो खोटा होता आणि त्या व्यक्तीने स्वत ची ओळख कस्टमर केअऱ म्हणून सांगितली होती. वास्तविक तोच स्कॅमर होता. या स्कॅमरने महिलेचा विश्वास संपादन करुन रिमोट अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन घेण्यात तो यशस्वी ठरला. या अॅपच्या माध्यमातून त्याने महिलेची वैयक्तिक माहिती, बँक खात्याची माहिती आणि पैसे चोरले.
वास्तविक, कोणतीही बँक अथवा वित्तीय संस्था एखाद्या व्यक्तीचा ओटीपी, वैयक्तिक माहिती मागत नाही. तसा अधिकार त्यांना नाही. ही बाब सर्वसामान्यांनी लक्षात घेतली पाहिजे. त्यांमुळे अशा कोणत्याही प्रकारची माहिती कुणालाही शेअर करु नका असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
संबंधित बातम्या