
Wipro Layoffs : गुगल, अॅमेझॉन आणि स्विगीनंतर आता दिग्गज आयटी कंपनी विप्रोमधून कर्मचारी कपातीची बातमी आहे. ४०० हून अधिक एंट्री लेव्हल कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. कारण प्रशिक्षणानंतरही त्याचे इंटरनल रेटिंग्ज खूपच खराब होते. कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटी क्षेत्रात कंपनीने आज आपले स्थान बक्कळ केले आहे. निर्धारित लक्ष्य पूर्ण कऱण्यासाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक एन्ट्री लेव्हलच्या कर्मचाऱ्यांकडून कुशलतेची अपेक्षा आम्ही करतो.
कंपनीने म्हटले आहे की मूल्यांकन प्रक्रियेमध्ये कंपनीच्या व्यावसायिक उद्दिष्टांनुसार आणि आमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार कर्मचार्यांना कौशल्य देण्याचा आमचा प्रयत्न असतो. ही एक व्यापक कामगिरी मूल्यांकन प्रक्रिया आहे. आम्हाला ४५२ फ्रेशर्सना काढून टाकावे लागले कारण त्यांनी प्रशिक्षणानंतरही वारंवार मूल्यांकनात खराब कामगिरी केली. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रानुसार, कंपनीने प्रभावित कर्मचार्यांना प्रशिक्षणाच्या खर्चासाठी प्रत्येकी ७५ हजार रुपये द्यावे लागतील परंतु कंपनीने हा खर्च "माफ" केला आहे.
गेल्या आठवड्यात, कंपनीने डिसेंबर २०२२ तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात अपेक्षेपेक्षा चांगली २.८ टक्के वाढ नोंदवली आणि जागतिक पातळीव नकारात्मक संकेत असूनही चौथ्या तिमाहीसाठी "मजबूत" बुकिंगबद्दल आशावाद व्यक्त केला.
संबंधित बातम्या
