Wipro to freshers : जागतिक पातळीवर मंदीमुळे सुरु झालेल्या नोकर कपातीचा परिणाम भारताच्या आयटी क्षेत्रावरही दिसत आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने ४०० कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर आणखी एक झटका दिला आहे. कंपनीच्या ट्रेनिंगनंतर नोकरी जाॅईन करण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या फ्रेशर्सना निम्म्या पगारावर रुजू होण्यास सांगितले आहे.
ज्या उमेदवारांनी आपले ट्रेनिंग पूर्ण केले आहेत, त्यांना ६.५ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देण्यात आले होते.मात्र आता विप्रोने या उमेदवारांना ईमेलद्वारे विचारले आहे की, तुम्ही ३.५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर कंपनी रुजू करण्यास उत्सुक आहात का ?
कंपनीने ईमेल पाठवले
कंपनीने उमेदवारांना पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, प्रत्येक वेळी आम्ही जागतिक अर्थव्यवस्था आणि क्लाएंट्सच्या गरजेचे आकलन करत असतो. बदलत्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे ३.५ लाख रुपये वार्षिक पॅकेजसह प्रोजेक्ट्स इंजिनिअर्ससाठी संधी आहेत. आर्थिक वर्ष २०२३ बॅचमध्ये फ्रेशर्स कॅटेगरीमध्ये विप्रोच्या सर्व उमेदवारांना हा प्रस्ताव दिला आहे. उमेदवारांच्या जाॅईनिंगची प्रक्रिया मार्च २०२३ पासून सुरु होईल. उमेदवारांसाठी हा प्रस्ताव मर्यादित काळासाठी आहे. जर त्याने हा प्रस्ताव स्विकारला तर मागील ६.५ लाखांची आॅफर रद्द होईल.
४५३ फ्रेशर्सची नोकरकपात
यावर्षी जानेवारी महिन्यात विप्रोमधून अंदाजे ४५२ फ्रेशर्सची कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फ्रेशर्सचा परफाॅर्मन्स चांगला नाही. ज्या कर्मचाऱ्यांची कपात झाली आहे त्यांच्या ट्रेनिंगवर करण्यात आलेला खर्च कंपनीने माफ केला आहे. फ्रेशर्सच्या ट्रेनिंगवर ७२ हजार रुपये प्रती व्यक्ती खर्च झाला आहे.
संबंधित बातम्या