मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gas Cylinder Price : ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच गॅस सिलिंडर महाग होणार? का होतेय ही चर्चा

Gas Cylinder Price : ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच गॅस सिलिंडर महाग होणार? का होतेय ही चर्चा

May 27, 2024 10:54 AM IST

Gas Cyliner Price : येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच गॅस सिलिंडर महाग होणार? का होतेय ही चर्चा
४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच गॅस सिलिंडर महाग होणार? का होतेय ही चर्चा

Gas Cyliner Price : जवळपास सव्वा महिना सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान १ जून २०२४ रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूनं लागेल हे ४ जून रोजी कळेल, पण निवडणुकांनंतर एलपीजी सिलिंडरचे दर वाढतील, अशी चर्चा आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात निवडणुकांच्या आधी आणि नंतर घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत अनेकदा बदल झाले आहेत. त्यामुळंच ही चर्चा सुरू झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केल्या जातात. १ जून २०१४ रोजी दिल्लीत विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९०५ रुपये प्रति सिलिंडर होती. तर, अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ४१४ रुपये होती. आज म्हणजेच २७ मे २०२४ रोजी दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत १७४५.५० रुपये आहे.

आधी स्वस्त, नंतर महाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पहिला कार्यकाळ मे २०१४ ते २०१९ आणि दुसरा कार्यकाळ २०१९ पासून आत्तापर्यंतचा आहे. इंडियन ऑइलच्या आकडेवारीनुसार, १ मे २०१४ रोजी दिल्लीत सबसिडीशिवाय त्याच सिलिंडरची किंमत ९२८.५० रुपये होती. १ जून २०२३ रोजी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये होती. याचा अर्थ असा की, गेल्या १० वर्षांत एकूण घरगुती एलपीजी सिलिंडर फक्त १२५ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात विनाअनुदानित घरगुती सिलिंडरची किंमत २१६ रुपयांनी कमी करण्यात आली होती. १ मे २०१४ रोजी ९२८.५० रुपये असलेलाी सिलिंडर १ मे २०१९ रोजी ७१२.५० रुपयांवर आला. दुसऱ्या कार्यकाळात तोच सिलिंडर ७१२.५० रुपयांनी वाढून ११०३ रुपयांवर पोहोचला आणि आता तो ८०३.५० रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच किंमत ९१ रुपयांनी वाढली आहे.

मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर जून २०१४ मध्ये सिलिंडरची किंमत ९८०.५० रुपये झाली. ऑक्टोबर २०१४ मध्ये हीच किंमत ८८३.५० रुपये झाली. फेब्रुवारी २०१५ मध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ६०५ रुपयांपर्यंत घसरली आणि ऑगस्ट २०१५ मध्ये ५८५ रुपये झाली. ऑक्टोबरमध्ये घरगुती सिलिंडर ५१७.५० रुपयांच्या वर्षातील नीचांकी पातळीवर आला. एप्रिल २०१६ पर्यंत सिलिंडर ५०९.५० रुपयांपर्यंत खाली आला. तर, २०१८ मध्ये लोकांना एका सिलिंडरसाठी ९४२.५० रुपये मोजावे लागत होते.

निवडणूक वर्षात दिलासा

निवडणूक वर्ष २०१९ मुळे एलपीजी ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला. फेब्रुवारीमध्ये सिलिंडरची किंमत ६५९ रुपयांपर्यंत घसरली. ऑगस्टपर्यंत ती ५७४.५० रुपयांपर्यंत खाली आली, परंतु निवडणूक आटोपल्यानंतर २०२० च्या सुरुवातीला ही किंमत ७१४ रुपयांवर गेली. फेब्रुवारीमध्ये ती ८५८.५० रुपयांवर पोहोचली.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती मे महिन्यात ५८१.५० रुपयांपर्यंत घसरल्या आणि नोव्हेंबर २०२० पर्यंत ५९४ रुपयांवर स्थिर होत्या. डिसेंबर २०२१ मध्ये सिलिंडरचा दर ८९९.५० रुपयांवर पोहोचला आणि २१ मार्च २०२२ पर्यंत दरात कोणताही बदल झालेला नाही.

एलपीजी सिलिंडरचे दर यंदा ३०० रुपयांनी कमी

दिल्लीत २२ मार्च २०२२ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर ९४९.५० रुपयांवर गेला आणि मे महिन्यात १००० रुपयांच्या वर गेला. यानंतर ६ जुलै २०२२ रोजी सिलिंडर १०५३ रुपयांवर पोहोचला. तेव्हापासून ते फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंमती स्थिर होत्या. मार्च २०२३ मध्ये सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढल्या आणि किंमत ११०३ रुपयांवर पोहोचली. यानंतर, ३० ऑगस्ट २०२३ रोजी, २०० रुपयांचा दिलासा मिळाला आणि किंमत ९०३ रुपये झाली. ९ मार्च २०२४ रोजी पुन्हा एकदा सिलिंडर १०० रुपयांनी स्वस्त झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ४ जून रोजी जाहीर होणारे लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वसामान्यांना गॅस दरवाढीचा फटका देणारे ठरणार का याविषयी उत्सुकता आहे.

WhatsApp channel
विभाग