जुने पॅनकार्ड होणार बाद! आता मिळणार क्यूआर कोड असलेले नवे कार्ड; मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  जुने पॅनकार्ड होणार बाद! आता मिळणार क्यूआर कोड असलेले नवे कार्ड; मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

जुने पॅनकार्ड होणार बाद! आता मिळणार क्यूआर कोड असलेले नवे कार्ड; मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय

Nov 26, 2024 10:09 AM IST

PAN 2.0 Project : पॅन कार्ड अपग्रेड करण्याच्या पॅन २.० प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता नव्या पॅन कार्डवर क्यूआर कोड देण्यात येणार येणार आहे. या प्रकल्पामुळे जुने कार्ड कालबाह्य होणार का ? नवे क्यु आर कोड असलेले पॅनकार्ड कसे मिळवायचे या बद्दल माहिती घेऊयात.

क्या पुराना PAN कार्ड हो जाएगा बेकार? कैसे मिलेगा QR कोड वाला नया कार्ड
क्या पुराना PAN कार्ड हो जाएगा बेकार? कैसे मिलेगा QR कोड वाला नया कार्ड

PAN 2.0 Project : पॅन कार्ड अद्ययावत करण्याच्या पॅन २.० प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. त्यामुळे नवे पॅन कार्ड आता क्यूआर कोडसह दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे सध्या जुने कार्ड आहे, त्यांना क्यूआर कोड असलेले नवे पॅनकार्ड कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नव्या पॅनकार्डसाठी पुन्हा अर्ज करावा लागेल का? जुन्या कार्डचे काय होणार या सर्व प्रश्नाची उत्तरे घेऊयात. 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या प्रकल्पाची माहिती सोमवारी संसदेत दिली.  पॅन क्रमांक बदलण्याची गरज नाही, असे देखील वैष्णव म्हणाले. या प्रकल्पावर १४३५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

नवीन पॅन कार्ड मिळेल का?

या योजनेनुसार सर्वांना नवे पॅन कार्ड दिले जाणार आहे.  सध्याच्या पॅनकार्डधारकांना त्यांचे  पॅन कार्ड बदलण्याची किंवा नवीन कार्डसाठी अर्ज करण्याची गरज नाही.

नव्या पॅन कार्डमध्ये काय होणार बदल ?

वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार, नवीन कार्डमध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे.  डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन २.० प्रकल्प सक्षम करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यामुळे सरकारी यंत्रणांच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी पॅन एक कॉमन आयडेंटिफायर म्हणून यापुढे पात्र ठरणार आहे. 

पॅन अपग्रेडेशनसाठी पैसे द्यावे लागतील का?

पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावी लागतील का असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. यावर अश्विनी यांनी स्पष्टीकर दिले आहे. पॅन अपग्रेडेशन विनामूल्य केले जाणार आहे. तसेच ते घरपोच देण्यात येणार आहे.   वैष्णव म्हणाले, 'आतापर्यंत पॅनकार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअर १५ ते २० वर्षे जुने असल्याने यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. नव्या प्रणालीअंतर्गत पॅनकार्डशी संबंधित सर्व यंत्रणा डिजिटल पद्धतीने तयार करण्यात येणार आहेत, जेणेकरून तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यात येईल.

करदात्यांवर काय होणार परिणाम ? 

करदात्यांवर या पॅनकार्ड बदलाचा काय परिणाम होणार या बाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  आतापर्यंत ७८  कोटी पॅनकार्ड वितरित करण्यात आले आहेत.  पॅन २.० प्रकल्पामुळे जलद सेवा आणि कार्यक्षमतेद्वारे करदात्यांचा अनुभव सुधारेल असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला आहे.  करदात्यांची सुलभ नोंदणी व त्यांना जलद सेवा देण्यासाठी या नव्या पॅनकार्डचा फायदा होईल अशी माहिती वैष्णव यांनी संसदेत दिली. 

काय फायदा होणार ? 

या नव्या प्रणालीचा उद्देश सध्या अस्तित्वात असलेल्या पॅन/टॅन १.० या सिस्टीमला अद्ययावत करे हा आहे. या सोबतच कोअर व नॉन-कोर पॅन/टॅन अॅक्टिव्हिटीज आणि पॅन व्हेरिफिकेशन यंत्रणेचे एकत्रीकरण करणे हे या देखील नव्या प्रणालीचा उद्देश आहे. पॅन २.० मुळे तक्रार निवारण यंत्रणा अद्ययावत होणार आहे. या सोबतच करदात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट सिस्टीम तयार करण्यात येत आहे.  युनिफाइड पोर्टल असल्याने इतर पोर्टलवर जाण्याची गरज भासणार नाही, असे वैष्णव म्हणाले. "

Whats_app_banner