Bank Holiday : मकर संक्रांतीला आज कोणत्या शहरांत बँका बंद? जाणून घ्या आरबीआयचे कॅलेंडर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank Holiday : मकर संक्रांतीला आज कोणत्या शहरांत बँका बंद? जाणून घ्या आरबीआयचे कॅलेंडर

Bank Holiday : मकर संक्रांतीला आज कोणत्या शहरांत बँका बंद? जाणून घ्या आरबीआयचे कॅलेंडर

Jan 14, 2025 09:34 AM IST

Makar Sankranti Holiday : आज १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत, पोंगल, माघे संक्रांत आणि हजरत अली यांच्या वाढदिवसामुळं देशभरातील काही बँका बंद राहतील.

Bank Holiday : मकर संक्रांतीला आज कोणत्या शहरांत बँका बंद? जाणून घ्या आरबीआयचे कॅलेंडर
Bank Holiday : मकर संक्रांतीला आज कोणत्या शहरांत बँका बंद? जाणून घ्या आरबीआयचे कॅलेंडर

Makar Sankranti Holiday : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्टीच्या यादीनुसार मंगळवार, १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत, उत्तरायण पुण्यकाळ, पोंगल, माघे संक्रांत, माघ बिहू आणि हजरत अली यांच्या वाढदिवसानिमित्त देशातील काही भागात बँका बंद राहतील. 

अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद-आंध्र प्रदेश, हैदराबाद-तेलंगणा, ईटानगर, कानपूर आणि लखनौ या शहरांमध्ये आज बँकांना सुट्टी असेल. मात्र जर तुम्ही ऑनलाईन आणि मोबाईल बँकिंग सर्व्हिस अ‍ॅपशी कनेक्ट असाल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. बँकेच्या एटीएममधूनही ग्राहक पैसे काढू शकतात.

विविध राज्यांनुसार देशभरात बँकांच्या सुट्ट्या बदलतात. त्यामुळं ग्राहकांनी आपल्या जवळच्या बँकेच्या शाखेत सुट्ट्यांची यादी तपासावी. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) जाहीर केलेल्या वार्षिक सुट्टीच्या कॅलेंडरमध्ये चेक आणि प्रॉमिसरी नोट्स जारी करण्याचं नियमन करणाऱ्या नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अ‍ॅक्टच्या तरतुदींनुसार बँकांच्या सुट्ट्यांचा उल्लेख केला जातो. या सुट्ट्यांच्या काळात चेक आणि प्रॉमिसरी नोट्सच्या सेवा उपलब्ध नसतात.

मकर संक्रांत

हा एक हिंदू सण भारतभर साजरा केला जातो. या दिवसापासून नव्या कृषी चक्राची सुरुवात होते आणि हिवाळ्याचा शेवट होतो.

उत्तरायण

उत्तरायण प्रामुख्यानं गुजरातमध्ये साजरं केलं जातं. सूर्याच्या उत्तरेकडील हालचाली दर्शवितं. हे नाव "उत्तरम" (उत्तर) आणि "अयानम" (आंदोलन) या संस्कृत शब्दांपासून आले आहे. यास उत्तरायणम देखील म्हणतात.

पोंगल

पोंगल हा दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडूमध्ये चार दिवसांचा कापणी सण आहे. काढणीबद्दल विश्वासी लोक सूर्य, निसर्गमाता आणि शेतातील प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.

माघे संक्रांत

माघे संक्रांत हे सिक्कीम आणि नेपाळसारख्या ठिकाणी मकर संक्रांतीचे दुसरं नाव आहे. कापणीचा हंगाम म्हणून हा सण साजरा करतात.

माघ बिहू

आसाममधील कापणी सणाला माघ बिहू म्हणतात. या सणाला भोगली बिहू किंवा मगहर डोमाही असेही म्हणतात.

हजरत अली यांचा जन्मदिवस

इस्लामी दिनदर्शिकेनुसार रजबच्या तेराव्या दिवशी साजरा केला जातो. २०२५ मध्ये हा दिवस १४ जानेवारी रोजी साजरा केला जाईल. हजरत अली हे इस्लामचे चौथे खलिफा आणि शिया इस्लामचे पहिले इमाम आहेत. इस्लामी शासन, तत्त्वज्ञान आणि अध्यात्मातील योगदानासाठी ते ओळखले जातात.

Whats_app_banner