Stock Market latest Updates today : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात कमालीची तेजी दिसत आहे. सर्वच क्षेत्रीय निर्देशांक वाढलेले आहेत. बँक निफ्टीपासून निफ्टी हेल्थ केअर इंडेक्सपर्यंत सर्व निर्देशांक हिरवेगार झाले आहेत. निफ्टी आयटी, निफ्टी रिअॅलिटी आणि मीडिया इंडेक्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.
निफ्टी आयटीचे सर्व १० समभाग तेजीत आहेत. हा निर्देशांक १.७५ टक्क्यांनी वधारला आहे. यात एमफासिस ५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून २८६० रुपयांवर पोहोचला आहे. एलटीटीएस ४.५९ टक्क्यांनी वधारून ५१४२.७५ रुपयांवर आहे. कोफोर्ज २.८८ टक्के आणि विप्रो २.७६ टक्क्यांनी वधारला आहे. टीसीएस २.२१ टक्क्यांनी वधारून ४३९० रुपयांवर पोहोचला आहे. एलटीआय अँड माइंड ट्री २.११ टक्क्यांनी वधारून ५५४२ रुपयांवर आहे. पर्सिस्टंट शेअर्समध्ये १.८० टक्क्यांची वाढ झाली आहे. टेक महिंद्राचे शेअरही १.३५ टक्क्यांनी वधारले आहेत. एचसीएल टेक १.२९ टक्के आणि इन्फोसिस ०.८४ टक्क्यांनी वधारला आहे.
रिअॅलिटी निर्देशांक १.७४ टक्क्यांनी वधारला आहे. डीएलएफ ३.८२ टक्क्यांनी वधारून ८५३.०५ रुपयांवर पोहोचला. ओबेरॉय रियल्टीमध्ये १.७५ टक्के वाढ झाली आहे. गोदरेज प्रॉपर्टी १.६४ टक्क्यांनी वधारून २९२०.९० रुपयांवर पोहोचली आहे. सनटेक १.६० टक्क्यांनी वधारला आहे. शोभा १.४२ टक्के, लोढा १.३३ टक्के आणि प्रेस्टीज १.२६ टक्क्यांनी वधारले आहेत. महिंद्रा लाइफ, ब्रिगेड आणि फिनिक्स मध्येही तेजी आहे.
निफ्टी मीडिया इंडेक्सचे १० पैकी ७ शेअर्स ग्रीन मार्कवर आहेत. पीव्हीआर आयनॉक्स ४ टक्क्यांहून अधिक वधारला आहे. टिप्स इंडिया ३.५४ टक्के, सारेगामा २.५१ टक्के, झी ०.८६ टक्के आणि नझारा ०.७४ टक्क्यांनी वधारला आहे. नेटवर्क १८ आणि डिश टीव्हीदेखील सकारात्मक वाटचाल करत आहेत.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढून व्यवहार करत असून ८० हजारच्या जवळपास पोहोचला आहे. तर निफ्टी २०० हून अधिक अंकांनी वाढून २४३५० पर्यंत पोहोचला आहे.