Explainer on EVs Insurance : पावसाळ्यात वाहनांची विशेष देखभाल आवश्यक ठरते आणि हाच नियम इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) देखील लागू होतो. पर्यावरणपूरक वैशिष्ट्य आणि अल्प खर्चामुळे ईव्ही लोकप्रिय होत असून पावसाळ्यात वाहन सुरळीत चालावे यासाठी सुयोग्य देखभाल आवश्यक ठरते. ईव्ही मालकांसाठी पावसाळा ठरावीक आव्हाने घेऊन येतो. तरीच अशा ऋतूमध्ये ईव्हीची विश्वसनियता आणि कामगिरीला धक्का लागू नये यासाठी प्रस्तावित धोके व आवश्यक देखभाल समजून घेणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही ईव्हीचे मालक असल्यास पुढील मुद्दे ध्यानात ठेवावे:
मान्सूनच्या आगमनापूर्वी, अधिकृत वर्कशॉपने बॅटरी किंवा मोटारच्या केसिंगला झालेल्या कोणत्याही नुकसानाची दखल घेत वाहन तपासले पाहिजे. पावसाचे पाणी वाहनात जाण्यापासून रोखण्यासाठी बाहेरील केसमधील कोणत्याही किरकोळ फटीची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा भरपूर नुकसान होऊ शकते. वाहनाच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर कोणतेही सूचक चिन्ह असल्यास, संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वर्कशॉपमध्ये तपासणीची खातरजमा करावी, असे मत रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे सीईओ राकेश जैन यांनी सांगितले.
पावसाळ्यात ईव्ही बॅटरीचे चार्जिंगही अधिक काळजीपूर्वक हाताळले पाहिजे. पाऊस पडत असताना तुम्हाला तुमची ईव्ही चार्ज करायची असल्यास, वाहन व्यवस्थित झाकलेल्या आणि कोरड्या भागात असल्याची खात्री करा. तुमची ईव्ही चार्जिंगसाठी प्लग करण्यापूर्वी, शॉर्टसर्किट टाळण्यासाठी वाहन प्लग कोरडा आहे की नाही हे पाहण्यासाठी चार्जिंग पिन आणि पोर्ट तपासणे सर्वोत्तम राहील.
पावसाळ्यात खड्डे किंवा पाणी साचलेल्या रस्त्यावरून वाहन चालवणे आणि सखल भागात पार्किंग करणे टाळा. त्यामुळे इलेक्ट्रिकल भागांचे संभाव्य नुकसान होण्यापासून संरक्षण तसेच बॅटरीचा ओलावा मर्यादित ठेवण्यास मदत करेल. दीर्घकाळापर्यंत कमी बॅटरी चार्जवर वारंवार ईव्ही चालवू नका, कोणत्याही संकट काळात वाहन अधिकृत वर्कशॉपमध्ये टोइंग करणे सर्वोत्तम आहे.
मोटार विमा हा केवळ पावसाळ्यातच नव्हे तर वर्षभर ईव्ही संरक्षणासाठी आवश्यक आहे. सर्वसमावेशक थर्ड पार्टी, मोटर विमा घेतल्यास स्वतःचे नुकसान आणि अगदी वैयक्तिक अपघातांपासून संरक्षण मिळू शकते. वाहन कोंडीमुळे घडणारे अपघात, ईव्ही बॅटरीला आग लागणे किंवा इतर कारणांमुळे शारीरिक/मृत्यू किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास मोटार विम्याचा थर्ड पार्टी घटक तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कवच देऊ शकतो. तसेच, ईव्ही चार्जर असेंब्लीला कोणत्याही प्रकारच्या अपघाती नुकसानापासून संरक्षण आवश्यक असू शकते. ईव्ही चार्जर कव्हर आणि ईव्ही बॅटरी कव्हर सारख्या ईव्ही-विशिष्ट अॅड-ऑन्सची निवड केल्याने अशा नुकसानांपासून तुमचे संरक्षण होईल.
संबंधित बातम्या