केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, ईपीएफओ पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा विचार केला जात आहे. याअंतर्गत पीएफ खात्यात जमा झालेली एकूण रक्कम पेन्शनमध्ये रुपांतरित करण्याचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिला जाऊ शकतो. सामाजिक सुरक्षेसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीअंतर्गत कर्मचाऱ्यांना अधिक पर्याय देण्याची गरज असल्याचे मांडविया म्हणाले.
निवृत्तीनंतर एखाद्या कर्मचाऱ्याला आपल्या पीएफ खात्यात जमा झालेले सर्व पैसे पेन्शन फंडात रुपांतरित करावेत, जेणेकरून त्याला अधिक पेन्शन मिळू शकेल. त्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. पुढील काळात सर्व बाबींचा विचार करून नियमबदल होण्याची दाट शक्यता आहे.
जोडले गेले आहेत. चालू आर्थिक वर्षात जुलैमध्ये नोकरीवर रुजू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. नोकरी सुरू केल्यानंतर एकूण १९.९४ लाख लोकांनी ईपीएफओकडे नोंदणी केली. यापैकी 10.52 लाख कर्मचारी असे आहेत ज्यांनी प्रथमच नोकरी सुरू केली आहे.
ईपीएफओ पोर्टलशी संबंधित समस्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री म्हणाले की, आम्ही ईपीएफओ पोर्टलला बँकिंग वेबसाइटप्रमाणे बनविण्याच्या दिशेने काम करत आहोत. पुढील सहा महिन्यांत त्यात मोठी सुधारणा दिसून येईल. बँकिंग पोर्टलच्या धर्तीवर ईपीएफओच्या पोर्टलवर कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात, असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणेत सुधारणा करण्यात येत आहे.
रोजगाराच्या संधी वेगाने निर्माण करता येतील, अशी नवी क्षेत्रेही आम्ही शोधत आहोत. सेमीकंडक्टर उद्योग हेही त्यापैकीच एक क्षेत्र आहे. यामुळे भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे कारण भारतातील मोठ्या संख्येने कंपन्या सेमीकंडक्टर स्थापित करण्यास उत्सुक आहेत.