भारतातील श्रीमंतांचा लोक तिरस्कार का करतात? झिरोधाच्या मालकाने सांगितले खरे कारण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  भारतातील श्रीमंतांचा लोक तिरस्कार का करतात? झिरोधाच्या मालकाने सांगितले खरे कारण

भारतातील श्रीमंतांचा लोक तिरस्कार का करतात? झिरोधाच्या मालकाने सांगितले खरे कारण

HT Marathi Desk HT Marathi
Published Sep 28, 2024 06:29 PM IST

आपण समाजवादी-भांडवलदार असल्याचा आव आणणारा समाज आहोत. जोपर्यंत श्रीमंत आणि गरीब यांच्यात विषमता आहे, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.

नितीन कामत
नितीन कामत (photo-mint)

भारतात श्रीमंत लोकांकडे द्वेषाने का पाहिले जाते? या प्रश्नाचं उत्तर ब्रोकिंग प्लॅटफॉर्म झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामत यांनी दिलं आहे. आपण समाजवादी-भांडवलदार असल्याचा आव आणणारा समाज आहोत. जोपर्यंत श्रीमंत आणि गरीब यांच्यात विषमता आहे, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.

बेंगळुरूयेथील टेकस्पार्क्स २०२४ कार्यक्रमादरम्यान नितीन कामत यांना योरस्टोरीच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी हा प्रश्न विचारला. श्रीमंत लोकांच्या वागणुकीत भारतीय आणि अमेरिकन यांच्यातील फरक त्यांनी अधोरेखित केला होता. 'अमेरिकेत जर कोणी भरपूर पैसे कमवत असेल, खूप यशस्वी झाले आणि नवीन कार विकत घेत असेल तर ते कव्हर पेजवर येते. तिथं सगळं अगदी नॉर्मल आहे. समाज म्हणूनही ते श्रीमंत लोकांकडे तुच्छतेने पाहत नाहीत. दुसरीकडे, भारतात जेव्हा कोणी पैसे कमवतो, तेव्हा लोक खूप टीका करतात. त्यात काहीतरी गडबड असावी असे आम्हाला वाटते.

४४ वर्षीय

नितीन कामत

यांनी श्रद्धा शर्मा यांच्याशी सहमती दर्शवली. कामत यांनी भारतातील प्रचंड आर्थिक विषमता मान्य केली. यासोबतच त्यांनी भारताच्या समाजवादी मानसिकतेकडेही लक्ष वेधले. अमेरिका हा शुद्ध भांडवलशाही समाज आहे. आपण समाजवादी-भांडवलदार असल्याचा आव आणणारा समाज आहोत. जेव्हा कामत यांना सुधारणा शक्य आहे का, असे विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, तशी शक्यता नाही. जोपर्यंत आर्थिक विषमता कायम आहे, तोपर्यंत मला काहीही बदलताना दिसत नाही.

Whats_app_banner