Stocks To Buy Today : पेटीएम, पॉलिसी बाजारसह ५ शेअर्सवर एक्सपर्ट्सना विश्वास, काय आहेत कारणं?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy Today : पेटीएम, पॉलिसी बाजारसह ५ शेअर्सवर एक्सपर्ट्सना विश्वास, काय आहेत कारणं?

Stocks To Buy Today : पेटीएम, पॉलिसी बाजारसह ५ शेअर्सवर एक्सपर्ट्सना विश्वास, काय आहेत कारणं?

Jan 03, 2025 10:40 AM IST

Stocks To Buy Today 3 January 2025 : शेअर बाजारातील अभ्यासकांनी आजच्या दिवशी ५ शेअरवर बाजी लावण्याचा सल्ला दिला आहे. कोणते आहेत हे शेअर?

Stocks To Buy Today : पेटीएम, पॉलिसी बाजारसह ५ शेअर्सवर एक्सपर्ट्सना विश्वास, काय आहेत कारणं?
Stocks To Buy Today : पेटीएम, पॉलिसी बाजारसह ५ शेअर्सवर एक्सपर्ट्सना विश्वास, काय आहेत कारणं?

Share Market Updates : नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी काल सेन्सेक्स, निफ्टी वधारल्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. या पार्श्वभूमीवर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कोणत्या शेअर्सवर बाजी लावणं फायद्याचं ठरेल, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया यांनी आजच्या घडीला दोन शेअर निवडीची शिफारस केली आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन शेअर्स सुचवले आहेत. यात पॉलिसीबाजार, पेटीएम, पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड, एबी कॅपिटल आणि आरईसी लिमिटेड यांचा समावेश आहे.

सुमित बागरिया यांची शिफारस

पॉलिसीबाजार : 

पॉलिसीबाजारचा शेअर २२०३.२५ रुपयांत खरेदी करा. टार्गेट प्राइस २३५० रुपये ठेवा आणि २१२० रुपये स्टॉपलॉस लावा.

का खरेदी करावा? - पॉलिसीबाजारच्या शेअरमध्ये तेजीचा जोर आहे. यात लक्षणीय चढ-उतार होत आहे.

पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज लिमिटेड

हा शेअर १६१६ रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी १५३३.६ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस १४८० रुपये ठेवा. 

का खरेदी करावा? - हा शेअर नजीकच्या काळात १६१६ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. शिवाय, पीजीआयएल सध्या त्याच्या महत्त्वपूर्ण २० दिवस, ५० दिवस आणि १०० दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (ईएमए) पातळीच्या वर ट्रेड करत आहे. त्यातून तो तेजीचा कल दर्शवतो.

गणेश डोंगरे यांचे शेअर्स

एबी कॅपिटल

एबी कॅपिटल १९५ रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी १८४ रुपयांना खरेदी करता येईल. स्टॉपलॉस १७७ रुपये ठेवा.

खरेदी का करावा? - शेअरच्या नुकत्याच झालेल्या शॉर्ट टर्म ट्रेंड अ‍ॅनालिसिसमध्ये तेजीचा रिव्हर्स पॅटर्न समोर आला आहे. तो १९५ रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. सध्या हा शेअर १७७ रुपयांवर महत्त्वपूर्ण आधारपातळी राखत असून सध्याचा बाजारभाव १८४ रुपये पाहता खरेदीची संधी निर्माण होत आहे.

आरईसी लिमिटेड

आरईसी लिमिटेड ५२० रुपयांना खरेदी करा. ५३५ रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी ५१० रुपये स्टॉपलॉस लावा.

का खरेदी करावा? - शेअरच्या नुकत्याच झालेल्या शॉर्ट टर्म ट्रेंड अ‍ॅनालिसिसमध्ये एक उल्लेखनीय तेजीचा रिव्हर्स पॅटर्न समोर आला आहे. तो ५३५ रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. हा शेअर सध्या ५१० रुपयांवर महत्त्वपूर्ण आधार पातळी राखत आहे. सध्याचा बाजारभाव ५२० रुपये पाहता खरेदीची संधी आहे.

पेटीएम

हा शेअर १०१० रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी ९६० रुपयांच्या स्टॉप लॉससह ९८० रुपयांना खरेदी करता येईल.

का खरेदी करावा? - शेअरच्या नुकत्याच झालेल्या शॉर्ट टर्म ट्रेंड अ‍ॅनालिसिसमध्ये एक उल्लेखनीय तेजीचा रिव्हर्स पॅटर्न समोर आला आहे. तो १०१० रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. हा शेअर सध्या ९६० रुपयांवर प्रमुख सपोर्ट लेव्हल दाखवत आहे. सध्याचा बाजारभाव ९८० रुपये पाहता खरेदीची संधी आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

 

Whats_app_banner