मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Mutual Fund : वयाच्या ८० व्या घर विकून केली म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक? कसा होतोय फायदा?

Mutual Fund : वयाच्या ८० व्या घर विकून केली म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक? कसा होतोय फायदा?

May 27, 2024 12:17 PM IST

Mutual Fund Investment : वयाच्या ८० व्या वर्षी आपलं घर विकून त्यांनी म्युच्युअल फंडांत गुंतवणूक केली. तेव्हापासून ते आपल्या गुंतवणुकीचा उपयोग घर खरेदी, धर्मादाय संस्थांना देणगी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी करत आहेत.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाच्या ८० व्या वर्षी जोडप्यानं घर विकलं? का घेतला असा निर्णय?
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वयाच्या ८० व्या वर्षी जोडप्यानं घर विकलं? का घेतला असा निर्णय?

Mutual Fund Investment : सत्पात्री दानासाठी वापरलेली संपत्ती धन्य असते आणि सद्गुणांमध्ये बुडालेली बुद्धी ही वरदान असते…

ट्रेंडिंग न्यूज

संत तुलसीदास यांनी रचलेल्या कवितेतील एक दोहा उद्धृत करताना राम मोहन पांडे हे समाजाप्रति असलेली बांधिलकी स्पष्ट करतात. बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) दोन दशकांपूर्वी निवृत्त झालेले ८६ वर्षीय प्राध्यापक पांडे यांनी आपलं घर विकून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे. आपल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्यातील ६-१० टक्के रक्कम ते धर्मादाय संस्थांना दान करतात.

निवृत्तीचे लाभ, परदेशात नोकरी करणाऱ्या मुलाचे मोलाचे योगदान आणि काही प्रमाणात कर्ज घेऊन पांडे यांनी २००० मध्ये बनारसमध्ये एक मोठं घर विकत घेतलं. त्याच वर्षी ते बीएचयूमधून निवृत्त झाले, परंतु घर तयार होईपर्यंत ते दोन वर्षे कॅम्पसमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. पाच हजार चौरस फुटांच्या भूखंडावर बांधलेलं हे घर हा त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग होता.

भविष्य निर्वाह निधीच्या मोठ्या रकमेबरोबरच त्यांना चांगली पेन्शन सुरू झाली. पेन्शनमुळं स्थिर आणि खात्रीशीर उत्पन्न सुरू झालं. त्यामुळं घरखर्च निघू लागला. शिवाय वडिलोपार्जित जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबाच्या जेवणाचा बराचसा खर्च उचलला जात असे.

गुंतवणुकीच्या मार्गावर

पांडे यांचा गुंतवणुकीचा प्रवास २०१९ मध्ये घर विकल्यानंतरच सुरू झाला. हे घर विकण्याचं कारण व्यावहारिक होतं. त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न झालं होतं आणि घर सांभाळणं कठीण झालं होतं. पांडे आणि त्यांची पत्नी दरवर्षी ६-७ महिने मुंबईत आपल्या मुलींकडं राहायला जात असल्यानं एवढ्या मोठ्या घराची देखभाल होणं शक्य नव्हतं. घर भाड्यानं देऊन विनाकारण ताण घ्यायचा नव्हता म्हणून आम्ही ते घर विकलं, असं पांडे सांगतात.

घर विकल्यानंतर पांडे यांना बँकांकडून फोन येऊ लागले. मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवण्याची विनंती केली जाऊ लागली. मात्र त्यांनी विरोध केला. त्यानंतर त्यांच्या जावयानं त्यांची ओळख मुंबईतील म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर सृजन फायनान्शियल सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय भागीदार दीपाली सेन यांच्याशी करून दिली.

पांडे आणि त्यांच्या पत्नीनं घरातून मिळालेली रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली. सुरुवातीला पांडे यांनी पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेसमध्ये (PMS) काही निधी गुंतवला, पण त्याचा फारसा फायदा होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी हे पैसे म्युच्युअल फंडात हलवले.

म्युच्युअल फंड, विशेषत: इक्विटीमध्ये गुंतवणूक पांडे यांच्यासाठी नवीन होती. दीपाली सेन यांनी त्यांना त्यासाठी तयार केलं. म्युच्युअल फंड त्यांच्यासाठी कसा योग्य आहे हे त्यांना पटवून सांगितलं. बँकांच्या मुदत ठेवींप्रमाणे, म्युच्युअल फंड परताव्याची हमी देत नाहीत परंतु इक्विटी म्युच्युअल फंड भारताच्या आर्थिक विकासाशी जोडलेले आहेत आणि दीर्घ मुदतीत चांगला परतावा देऊ शकतात. सेन यांनी पांडेंना मागील काही वर्षांची आकडेवारीही दाखवली. काही काळानंतर वर्षाला १२ टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळेल, असंही सेन यांनी सांगितलं.

पांडे यांचा पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी आणि शेअर बाजारातील अस्थिरतेचा धोका कमी करण्यासाठी सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनच्या (STP) माध्यमातून पांडे यांची इक्विटी गुंतवणूक करण्यात आली. एसटीपी गुंतवणूकदारांना नियमितपणे एका म्युच्युअल फंडातून, विशेषत: लिक्विड फंडातून गुंतवणुकीसाठी निश्चित केलेल्या दुसऱ्या म्युच्युअल फंडात ठराविक रक्कम हस्तांतरित करता येते.

दीपाली सेन यांनी पांडे कुटुंबाचा निधी इक्विटी आणि डेटमध्ये समप्रमाणात वाटला. पांडे यांनी बनारसमध्ये छोटं घर विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि गुंतवणुकीच्या निधीतील निम्मा भाग सुरुवातीला कर्जासाठी देण्यात आला होता. या दाम्पत्यानं २०१९ मध्ये छोटेखानी फ्लॅट खरेदी केला, परंतु आधीच्या मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी ८०-८५ टक्के रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवून ठेवली.

सध्या पांडे यांची गुंतवणूक इक्विटी फंडात ६२ टक्के आणि डेट फंडात ३८ टक्के आहे. घरखर्च चालवण्यासाठी ते एसडब्ल्यूपीचा (systematic withdrawal plan) वापर करतात. हा खर्च एकूण गुंतवणुकीच्या ४ टक्के आहे. त्यांच्या पेन्शनमधून उर्वरित घरखर्च भागविला जातो. त्यांच्या निधीपैकी ७ टक्के रक्कम धर्मादाय कार्यासाठी दिली जाते. ते आपल्या पेन्शनचा उपयोग धर्मादाय कार्यासाठी आणि तीर्थयात्रेसाठी देखील करतात.

वैद्यकीय खर्च

राम मोहन पांडे व त्यांच्या पत्नीला बीएचयूनं वैद्यकीय विम्याची सुरक्षा दिली आहे. मात्र त्यांमनी स्वत:चा स्वतंत्र विमा काढला आहे. पत्नीला दम्याचा त्रास असल्याने ते हिवाळ्यात मुंबईत राहतात. "दरवर्षी आम्ही सहा-सात महिने मुंबईत असतो. कुठलीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तिथं माझ्या मुली आमची काळजी घेतात. इकडं बनारसमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी आमच्या जवळचं सध्या कुणीच नाही, असं पांडे सांगतात.

पांडे यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि कर्जाचे मिश्रण ६०:४० च्या प्रमाणात आहे. दर दोन वर्षांनी सर्वात जुन्या इक्विटी गुंतवणुकीतील निधी पुढील दोन वर्षांसाठी एसडब्ल्यूपी कव्हर करण्यासाठी त्याच्या डेट कॉर्पसमध्ये हलविला जातो. एखाद्या महत्त्वपूर्ण आपत्कालीन किंवा वैद्यकीय गरजेच्या परिस्थितीत किंवा कर्जाच्या निधीची पूर्तता करण्यासाठी हे पैसे ट्रान्सफर केले जातात.

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीमुळं त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होऊनही मूळ गुंतवणूक वाढत आहे. ही सर्व गुंतवणूक तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा करू नका. 'दानधर्म करून जे काही उरेल, ते तुमचं असेल, असं पांडे यांनी मुलांना बजावून ठेवलं आहे.

WhatsApp channel