RBI data on Loan : व्यक्तिगत गरजांसाठी वैयक्तिक स्वरुपातील कर्ज घेणं हे काही नवीन नाही. मात्र, हे कर्ज घेऊन परतफेड न करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. असुरक्षित वैयक्तिक कर्ज घेण्याच्या बाबतीत ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ही आकडेवारी आहे. 'देशातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील लोकांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत ५ ते १५ लाख आणि १५ लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न गटातील लोकांच्या थकीत वैयक्तिक कर्जाचं प्रमाण वाढलं आहे. या दोन वर्गातील थकित वैयक्तिक कर्जाचा वाटा सुमारे ११ टक्क्यांनी वाढला आहे.
रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या डिसेंबर २०२४ च्या वित्तीय स्थैर्य अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत ५ ते १५ लाखांच्या उत्पन्न गटातील वैयक्तिक थकित कर्जाचा आकडा सप्टेंबर २०२४ पर्यंत ११ टक्क्यांनी वाढला आहे. १५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांचा वाटा ९ टक्क्यांनी वाढला आहे. तर, ५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्न गटातील लोकांच्या थकीत कर्जाचा हिस्सा केवळ एक टक्क्यानं वाढला आहे. बँकांची बहुतांश असुरक्षित वैयक्तिक कर्जे या उत्पन्न गटातील लोकांकडं अडकली आहेत. त्याचप्रमाणं ज्यांचं नियमित उत्पन्न नाही, त्यांच्या थकीत कर्जात २० टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या तीन वर्षांत नियमित उत्पन्न नसलेल्यांना कर्ज देताना बँकांनी सावधगिरी बाळगली आहे. अशा लोकांना बँकांकडून अनेकदा अल्प कालावधीसाठी अल्प रकमेचं कर्ज दिलं जातं. आरबीआयनं देखील बँकांना अशा कर्जांबाबत सावध राहण्यास सांगितलं होतं, त्यानंतर बँकांनी छोट्या कर्जाची वसुली वाढवली आणि नवीन कर्ज देताना खूप काळजी घेतली.
पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न गटातील लोकांकडं सर्वाधिक असुरक्षित वैयक्तिक कर्ज आहे. मार्च ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत हा आकडा किंचितही कमी झालेला नाही. मार्चमध्येही सुमारे ४२ टक्के असुरक्षित कर्जे या उत्पन्न गटातील लोकांकडं होती आणि सप्टेंबरमध्ये तेवढीच बुडीत कर्जे देण्यात आली होती. मात्र, मार्च २०२३ मध्ये हे कर्ज ५२ टक्क्यांपेक्षा अधिक होतं. म्हणजेच गेल्या दीड वर्षात त्यात घट झाली आहे.
मार्च २०२२………. ४२ ………………………….. ३७………………..१०
मार्च २०२३………. ५२………………………… ४२………………… १२
मार्च २०२४………. ४२……………….. ३२…………………………. ८
सप्टेंबर २०२४…….. ४२……………….. ३२…………………………. ८
संबंधित बातम्या