Stocks To Buy Today : आजच्या दिवशी खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर, तुम्ही कोणता घ्याल? पाहा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stocks To Buy Today : आजच्या दिवशी खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर, तुम्ही कोणता घ्याल? पाहा!

Stocks To Buy Today : आजच्या दिवशी खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर, तुम्ही कोणता घ्याल? पाहा!

Jan 07, 2025 10:16 AM IST

Stocks To Buy Today : एचएमपीव्ही व्हायरसमुळं सध्या पसरलेल्या भीतीच्या वातावरणात कोणते शेअर खरेदी करावेत, याबाबत काही तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

Stocks To Buy Today : आजच्या दिवशी खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर, तुम्ही कोणता घ्याल? पाहा!
Stocks To Buy Today : आजच्या दिवशी खरेदीसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे ५ शेअर, तुम्ही कोणता घ्याल? पाहा!

Share Market News Today : चिनी व्हायरसच्या भीतीमुळं काल झालेल्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार सध्या सावध झाले आहेत. अशा परिस्थितीत तज्ज्ञांनी आज इंट्राडे खरेदीसाठी ५ शेअर्स सुचवले आहेत.

चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया यांनी दोन शेअर निवडीचा सल्ला दिला आहे. आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी तीन स्टॉक सुचवले आहेत. यात पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड, शेली इंजिनीअरिंग प्लास्टिक लिमिटेड, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड, आरबीएल बँक लिमिटेड आणि कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.

सुमीत बागरिया यांची शिफारस

पीजी इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड (पीजीईएल)

पीजीईएल ९९६.४ रुपयांना खरेदी करा. टार्गेट प्राइस १०७५ रुपये आणि स्टॉपलॉस ९६५ रुपये ठेवा.

शैली इंजिनीअरिंग प्लॅस्टिक लिमिटेड

शैलीचा शेअरवर १,४७४.९ रुपये खरेदी करा. १,५५० रुपये लक्ष्य ठेवा आणि १,४०० रुपये स्टॉप लॉस लावा.

गणेश डोंगरे यांनी सुचवले खालील शेअर्स

सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) 

सीडीएसएल १७२५ रुपयांना खरेदी करा. १७६० रुपयांचं उद्दिष्ट ठेवा आणि १७०० रुपये स्टॉप लॉस ठेवा. 

आरबीएल बँक लिमिटेड

आरबीएल बँकचा शेअर १६७ रुपयांना खरेदी करा. लक्ष्य १७४ रुपये ठेवा आणि १६३ रुपये स्टॉप लॉस लावा.

कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड

कॉनकॉर्ड बायो २,१४३ रुपयांना खरेदी करा. टार्गेट २,२०० रुपये आणि स्टॉपलॉस २,१०० रुपये ठेवा.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner