मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel rates today: खनिज तेलाच्या किंमतीत घट, पेट्रोल डिझेल दर कमी होणार का ?

Petrol Diesel rates today: खनिज तेलाच्या किंमतीत घट, पेट्रोल डिझेल दर कमी होणार का ?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 05, 2023 08:43 AM IST

Petrol Diesel rates today: खनिज तेलाच्या किंमतींमध्ये जबरदस्त घसरण होऊनही देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे दर तेच आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का असाच सवाल आता सर्वसामान्यांमध्ये विचारला जात आहे.

petrol pump HT
petrol pump HT

\Petrol Diesel rates today : आज सकाळी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती जाहीर केल्या आहेत. आंततराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाच्या किंमती निम्म्यांनी घटल्या आहेत. डब्ल्यूटीआय ७७.१७ डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत गेल्या आहेत. तर ब्रेंट क्रूड अंदाजे ४.४३ टक्के घटीनंतर ८२.१० डाँलर्स प्रती बॅरल्सपर्यंत गेल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या किंमती २२८ व्या दिवशी स्थिर आहेत.

राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रती लीटर आणि डीझेल ८९.६२ रुपये प्रती लीटर आहेत.

देशातील सर्वात महाग पेट्रोल डिझेल राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये मिळत आहे. तर सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रती लीटर आणि डिझेल ९७.२४ रुपये प्रती लीटर आहेत. तुमच्या शहरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमती कमी होऊनही त्याचा फायदा अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीये. कारण तेल कंपन्यांना त्यांचे होणारे नुकसान भरुन काढण्याची ही संधी आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर एसएमएसवर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP 9224992249 वर पाठवू शकतात आणि HPCL ग्राहक 9222201122 वर HPPRICE पाठवू शकतात. BPCL (BPCL) ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.

शहर पेट्रोल डिझेल
भोपाळ२०८.६५९३.९
धनबाद९९.८०९४.६०
आगरा९६.३५८९.५२
लखनऊ९६.५७८९.७६
पोर्ट ब्लेअर८४.१७९.७४
देहरादून९५.३५९०.३४
चेन्नई१०२.६३९४.२४
परभणी१०९.४५९५.८५
रांची ९९.८४९४.६५

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग