मराठी बातम्या  /  बिझनेस  /  WhatsApp Upcoming Feature: आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही पाठवता येणार चांगल्या क्वालिटीचे फोटो आणि व्हिडिओ

WhatsApp Upcoming Feature: आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारेही पाठवता येणार चांगल्या क्वालिटीचे फोटो आणि व्हिडिओ

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 23, 2024 06:05 PM IST

WhatsApp Default Media Quality Settings: व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या वापरकर्त्यांसाठी डिफॉल्ट मीडिया क्वालिटी फीचर आणत आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांना चांगल्या क्वालिटीचे फोटो आणि व्हिडिओ एकमेकांना शेअर करता येऊ शकतात.

WhatsApps
WhatsApps (Pixabay)

WhatsApp New features: व्हॉट्सअ‍ॅप लवकरच त्यांच्या वापरकर्त्यांसाठी डिफॉल्ट मीडिया क्वालिटीचा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना चांगल्या क्वालिटीचे फोटो आणि व्हिडिओ एकमेकांना शेअर करता येतील. मेसेजिंग अ‍ॅप डिफॉल्ट एचडी अपलोडला परवानगी देण्याच्या फीचरवर काम करत आहे, जे हाय-रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओला सपोर्ट करेल.

नवीनतम व्हॉट्सअ‍ॅप बीटा अ‍ॅप, व्हर्जन २.२४.५.६, अ‍ॅपच्या स्टोरेज सेटिंग्जमध्ये एक नवीन पर्याय उघड करते, असे डब्ल्यूएबीटाइन्फोने म्हटले आहे. हे फीचर वापरकर्त्यांना त्यांच्या पसंतीची डिफॉल्ट मीडिया अपलोड गुणवत्ता सेट करण्यास परवानगी देईल, ज्यामुळे प्रत्येक फाइलसाठी सेटिंग्ज करण्याची आवश्यकता नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या आगामी अपडेटमध्ये "मीडिया क्वालिटी" पर्याय मिळेल, ज्यामुळे वापरकर्ते फोटो आणि व्हिडिओ अपलोडसाठी आवश्यक पर्याय निवडतील.

सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डिफॉल्ट सेटिंगमध्ये स्टोरेज स्पेस वाचवण्यासाठी स्टँडर्ड क्वालिटीला प्राधान्य दिले जाते. मात्र, यामुळे वापरकर्त्यांन चांगल्या क्वालिटीचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवताना अडचण येत होती. परंतु, आता फोटो किंवा व्हिडिओसाठी अ‍ॅडजस्टमेंटच्या त्रासाशिवाय एचडी अपलोडची निवड करू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप डिफॉल्ट मीडिया क्वालिटी फीचर कधी लॉन्च करेल, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, कंपनी लवकरच हे फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आपल्या ग्राहकांची सुरक्षा वाढवण्यासाठी व्हॉट्सॲप फोटो आणि व्हिडीओ फाइल्स पाठवण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता विचारेल. अशा परिस्थितीत जर तुम्हाला चांगल्या दर्जाचे चित्र पाठवायचे असल्यास वापरकर्त्यांना पर्याय मिळणार आहे.

WhatsApp channel

विभाग