मराठी बातम्या  /  business  /  WhatsApp : व्हाॅट्सअॅपवर चॅटींग करा भरपूर, नवे ५ फिचर्स येणार, जाणून घ्या डिटेल्स
whatsapp_HT
whatsapp_HT

WhatsApp : व्हाॅट्सअॅपवर चॅटींग करा भरपूर, नवे ५ फिचर्स येणार, जाणून घ्या डिटेल्स

24 January 2023, 16:10 ISTKulkarni Rutuja Sudeep

WhatsApp : व्हाॅटसअॅप यूजर्ससाठी आनंदाची बातमी. व्हाॅटस्अॅप चॅटिंग अधिक मजेदार करण्यासाठी कंपनीने नवे ५ फिचर्स आणण्याची योजना आखली आहे. काय होणार आहेत बदल, जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

WhatsApp : व्हाॅट्सअॅप चॅटिंगमध्ये नाविन्यता आणण्यासाठी कंपनीने अनेक नवे फिचर्स आणण्याची तयारी सुरु केली आहे. व्हाॅटस्अॅपच्या या अपकमिंग फिचर्समध्ये स्टेट्समध्ये व्हाॅइस नोट्सपासून नोटिफिकेशननेच काॅन्टॅक्ट्सला ब्लाॅक करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे. रिपोर्टनुसार, व्हाॅट्सअॅपच्या या फिचरला अँड्राॅईडसह आयओएस यूजर्सही वापरु शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

व्हाॅईस स्टेट्स अपडेट

व्हाॅट्सअॅप यूजर्स व्हाॅईस नोट्सला स्टेट्सच्या रुपात अपडेट करु शकतात. कंपनी या फिचर्सवर काम करत आहे. याची बिटा टेस्टिंग सुरु आहे. याचे बीटा व्हर्जन अँन्ड्राॅईड आणि आयओएसवरही दाखल होणार आहे. अंदाजे ३० सेकंद रेकाॅर्ड केलेले व्हाॅईस नोट्स तुमच्या स्टेट्समध्ये २४ तास राहू शकते.

अँन्ड्राॅईट टू अँड्राॅईड चॅट मायग्रेशन

व्हाॅट्सअॅपवर हे फिचर्स महत्त्वपूर्व ठरणार आहे. कारण यानंतर यूजर्स गुगल ड्राईव्ह आणि जीमेल अकाऊंटला सिंक करुन व्हाॅट्सअॅप चॅटला नव्या अँन्ड्राॅईड डिव्हाईसवर ट्रान्सफर करु शकतात. चॅट ट्रान्सफर प्रोसेसला सुरु करण्यासाठी यूजर्सला जून्या फोनमधील क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल.

थेट नोटिफिकेशनमधून ब्लाॅक करा काॅन्टॅक्ट

नको असलेल्या व्यक्तींचा काॅन्टॅक्ट ब्लाॅक करण्यासाठी व्हाॅट्सअॅप जबरदस्त फिचर्स आणणार आहे. याच्या मदतीने यूजर नको असलेल्या काॅन्टॅक्टला सरळ चॅट लिस्ट आणि नोटिफिकेशन सेक्शनमधून ब्लाॅक करु शकणार आहे. या फिचर्सचेही बीटा टेस्टिंग सुरु आहे.

ईमेजमधून टेक्स्ट करता येईल गायब

या फिचर्समुळे व्हाॅसअॅप यूजर्सना धम्माल येणार आहे. कंपनी आयओएस १६ मध्ये चॅटिंग दरम्यान शेअर केलेल्या इमेजेसमधून टेक्स्ट काढण्याचे फिचर्स दाखल करणार आहे. यासाठी ज्या इमेजमधील टेक्स्ट काढण्याची आहे त्या संबंंधित इमेज ओपन करावी लागेल. त्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्या टेक्स्ट डिटेक्शन बटन टॅप केल्यानंतर टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करता येईल.

 

विभाग