Whatsapp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरून भरता येणार गॅस, पाणी आणि वीजेचं बिल, येत आहे नवीन फीचर!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Whatsapp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरून भरता येणार गॅस, पाणी आणि वीजेचं बिल, येत आहे नवीन फीचर!

Whatsapp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरून भरता येणार गॅस, पाणी आणि वीजेचं बिल, येत आहे नवीन फीचर!

Ashwjeet Jagtap HT Marathi
Updated Feb 06, 2025 09:03 PM IST

Whatsapp Bill Payments Feature: लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवीन फीचर जोडले जाणार आहे. या फीचरमुळे ग्राहकांना घरबसल्या पाणी, वीज, गॅस आणि इतर गोष्टींची बिले भरता येणार आहे.

whatsapp direct bill payments feature
whatsapp direct bill payments feature

Whatsapp News: व्हॉट्सअ‍ॅपच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच नवीन फीचर जोडले जाणार आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांना पाणी, वीज, गॅससह इतर अनेक गोष्टींचे बिल भरता येणार आहे. 

एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप भारतातील युजर्ससाठी एका नव्या फीचरवर काम करत आहे. असे म्हटले जात आहे की, नवीन फीचर्स आणल्यामुळे युजर्सजवळपास सर्व प्रकारची बिले थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून भरू शकतील. नोव्हेंबर २०२० मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआयद्वारे पैसे पाठविण्याचा आणि प्राप्त करण्याचा पर्याय सुरू केला होता. अलीकडेच नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मेटा- मालकीच्या प्लॅटफॉर्मसाठी यूपीआय ऑनबोर्डिंग मर्यादा काढून टाकली, ज्यामुळे भारतातील सर्व वापरकर्त्यांसाठी आपल्या पेमेंट सेवांचा विस्तार करण्याची परवानगी मिळाली.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरच्या माध्यमातून भारतातील युजर्स बिल भरू शकतील, असं म्हटलं जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटासाठी अँड्रॉइड व्हर्जन २.२५.३.१५ मध्ये हे फीचर दिसले होते. यावरून असे दिसून येते की, हे अ‍ॅप देशात आपल्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची अपेक्षा करीत आहे. 

वापरकर्ते बिल भरू शकतील

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, नवीन फीचरच्या मदतीने युजर्स थेट व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून बिल भरू शकतील. यामध्ये वीज बिल, मोबाइल प्रीपेड रिचार्ज, एलपीजी गॅस पेमेंट, पाणी बिल, लँडलाईन पोस्टपेड बिल आणि भाडे भरणा यांचा समावेश असू शकतो.

हे फीचर भारतातील बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध होऊ शकते

रिपोर्टनुसार, बिल भरण्याचा पर्याय सध्या विकासाच्या टप्प्यात आहे. परंतु, वर नमूद केलेल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये आधीच एक अ‍ॅक्टिव्हिटी जोडण्यात आली आहे. या फीचरची रिलीज टाइमलाइन अद्याप समोर आलेली नाही. परंतु, चॅनेलवर स्थिर अपडेट रोल आउट होण्यापूर्वी हे भारतातील बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध होऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपसमोर मोठे आव्हान

भारतात ही सेवा सुरू करण्यापूर्वी प्लॅटफॉर्मला काही नियामक किंवा लॉजिस्टिक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या युजर्सला कॉन्टॅक्ट आणि बिझनेसला यूपीआय पेमेंट करण्याची परवानगी देते.

फोन पे, गुगल पेशी स्पर्धा

एनपीसीआयने व्हॉट्सअ‍ॅप पेसाठी युजरऑनबोर्डिंग कॅप काढून टाकल्यानंतर हे नवे फीचर दिसले आणि आता ते थेट फोनपे आणि गुगल पे सारख्या डेडिकेटेड पेमेंट प्लॅटफॉर्मशी स्पर्धा करू शकते, असेही अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला या अ‍ॅपवरून आंतरराष्ट्रीय पेमेंट करण्याची परवानगी देण्याच्या पर्यायाची चाचणी करताना दिसले होते.

Ashwjeet Jagtap

TwittereMail

अश्वजीत जगताप हिंदुस्तान टाइम्स मराठीमध्ये सीनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहे. अश्लजीत येथे राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स, टेक्नोलॉजी, ऑटो, व्हायरल न्यूज आणि करिअर संबंधित बातम्या लिहितो. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात एकूण ५ वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी लेटेस्टली- मराठी (डिजिटल), एबीपी माझा (डिजिटल) मध्ये कामाचा अनुभव. अश्वजीतला क्रिकेट आणि बुद्धिबळ खेळणे आणि बायोपिक चित्रपट पाहायला आवडतात.

Whats_app_banner