WhatsApp : व्हाॅट्सअॅपशी लिंक केलेले बँक खाते अशा प्रकारे हटवा, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
WhatsApp : जर तुम्ही व्हाॅट्सअॅप बँक पेमेंट सिस्टिमचा वापर करत नसाल अथवा ते तुम्हाला सोडायचे असेल तर त्यासाठी लिंक केलेले बँक खाते सहजरित्या काढून घेता येते. त्यासाठी ही प्रोसेस फाॅलो करा.
WhatsApp : व्हॉट्सअॅप हे अतिशय प्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप आहे. हे अनेक वैशिष्ट्यांसह लोकांचे एक उत्तम माध्यम आहे. मेसेज पाठवणे, फोटो-व्हिडिओ किंवा कॉल करणे याशिवाय व्हॉट्सअॅपने ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. व्हॉट्सअॅप पेमेंट सेवा त्यापैकी एक आहे.
ट्रेंडिंग न्यूज
व्हॉट्सअॅपच्या या यूपीआय आधारित पेमेंट सेवेद्वारे, वापरकर्ते त्यांच्या संपर्क यादीतील कोणत्याही मित्राला सहजपणे पैसे पाठवू शकतात अथवा मागणी करू शकतात. यूजर्सला ही सेवा अगदी सहज वापरता येते. तुम्हाला ही सेवा वापरायची नसेल, तर तुम्ही काही स्टेप्स फॉलो करून लिंक केलेले खाते हटवू शकतात.
तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे पैसे देऊ शकता
व्ंहाॅट्सअॅप यूपीआय २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. ते वापरण्याची पद्धत गुगल पे, पेटीएम इत्यादी सारखीच आहे. प्रत्येकजण या व्हाॅट्सअॅप पेमेंट सेवेचा वापर अगदी सहज करू शकतो. जेव्हा तुम्ही व्हाॅट्सअॅप उघडता आणि तीन डॉट्स असलेल्या आयकॉनवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला ही सेवा मिळते. याद्वारे तुम्ही सहज पेमेंट करू शकता.
तुमचे बँक खाते याप्रमाणे लिंक करा
इथे असलेल्या पेमेंट पर्यायामध्ये तुम्हाला तुमचे बँक खाते लिंक करावे लागेल. तुम्ही व्हॉट्सअॅपच्या या पेमेंट सिस्टमबद्दल समाधानी नसल्यास किंवा ती वापरू इच्छित नसल्यास, यूजर्सना त्यासाठी लिंक केलेले बँक खाते काढून टाकता येते. विशेष म्हणजे बँक खाते जोडणे जितके सोपे आहे तितकेच ते काढून टाकण्याची प्रक्रिया देखील सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही आणि ब्राउझर वापरण्याची गरज नाही.
लिंक बँक खाते कसे काढायचे ?
यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जा. त्यानंतर पेमेंट्स पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला बँक खाते दिसेल, त्यावर टॅप करा. आता बँक खाते काढा. अशाप्रकारे तुम्ही तुमचे बँक खाते व्हाॅट्सअॅप पे वर क्लिक करून काढून टाकू शकतात.
संबंधित बातम्या
विभाग