WhatsApp: अनोळखी लोकांच्या मेसेजनं वैतागलात? चिंता नको, लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येतंय नवीन फीचर!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  WhatsApp: अनोळखी लोकांच्या मेसेजनं वैतागलात? चिंता नको, लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येतंय नवीन फीचर!

WhatsApp: अनोळखी लोकांच्या मेसेजनं वैतागलात? चिंता नको, लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येतंय नवीन फीचर!

Updated Aug 20, 2024 07:30 PM IST

WhatsApp Block Unknown Messages: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच अनोळखी वापरकर्त्यांचे मेसेज ब्लॉक करण्याची सुविधा मिळणार आहे!

लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येतंय नवीन फीचर!
लवकरच व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येतंय नवीन फीचर! (Pixabay)

WhatsApp Block Unknown Messages Features: व्हॉट्सअ‍ॅप दोन नवीन फीचर्सची चाचणी घेत असून लवकरच अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्ससाठी ते लॉन्च केले जाऊ शकते. वापरकर्त्यांना लाइक रिअ‍ॅक्शनसह अनोळखी लोकांचे मेसेज ब्लॉक करणे अशी दोन फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅपची लोकप्रियता पाहता सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याची शक्यता वाढली. यामुळे अशी संभाव्य फसवणूक टाळवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

यापुढे, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लॉन्च केल्या जाणाऱ्या फीचर्समध्ये वापरकर्त्यांना अनोळखी लोकांकडून आलेले मेसेज ब्लॉक करू शकतील. अननोन मेसेज ब्लॉक असे या फीचरला नाव देण्यात आले. डब्ल्यूएबेटाइन्फोनेदिलेल्या माहितीनुसार, हे नवीन फीचर अद्याप चाचणीच्या टप्प्यात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील अँड्रॉइड व्हर्जन २.२४.१७.२४ च्या बीटावर हे फीचर शोधण्यात आले आहे. हे फीचर सुरू केल्यानंतर एका मर्यादेपेक्षा जास्त अनोळखी कॉन्टॅक्ट्सने पाठवलेले सर्व मेसेज आपोआप ब्लॉक होतील.

सायबर गुन्हेगाराला आळा घालण्याचा हेतू

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांना धमक्या आणि स्पॅम मेसेजेसपासून सावध करण्यासाठी टूल्स देण्यात आली आहेत. संभाव्य सुरक्षा उल्लंघनांपासून युजर्सचे संरक्षण करण्यासाठी हे फीचर लॉन्च केले जाणार आहे. हे वापरकर्त्यांना फिशिंग, घोटाळे आणि इतर कोणत्याही प्रकारच्या असुरक्षित क्रियाकलापांसारख्या सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे ज्यामुळे त्यांची संवेदनशील माहिती आणि त्यांच्या डिव्हाइसच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ शकतो. सध्या या फीचरची टेस्टिंग सुरू असून निवडक युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध आहे.

लाईक रिअ‍ॅक्शन' फीचर मिळणार!

याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन क्विक रिअ‍ॅक्शन फीचर आणत आहे, ज्यामुळे वापरकर्ते आपल्या कॉन्टॅक्टमधील स्टेटस लाइक करू शकतील, असेही डब्ल्यूएबीटाइन्फोने म्हटले आहे. स्टेटस टॅबवर रिप्लाय बटणाच्या बाजूला हे फीचर ठेवण्यात येणार आहे. स्टेटसवरील लाईक्स स्टेटस व्ह्यूअर्स लिस्टमधील वापरकर्यांना मेसेज टॅबवर नाहीतर अपडेट उघडल्यावर दिसतील.

फीचरची टेस्टिंग सुरू

मेटाच्या मालकीचा प्लॅटफॉर्म बऱ्याच काळापासून या फीचरवर काम करत आहे आणि लवकरच तो पब्लिक डेब्यू करण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जन २.२४.१७.२१ वर या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅपला नवा मेकओव्हर देण्याच्या मिशनवर मेटा असल्याचे दिसत आहे. प्लॅटफॉर्म लवकरच आपल्या वापरकर्त्यांसाठी कस्टम स्टिकर्स, शोधण्यायोग्य जीआयएफवाय इत्यादी नवीन स्टिकर वैशिष्ट्ये देखील आणत आहे.

 

 

 

 

 

Whats_app_banner