मराठी बातम्या  /  बिझनेस  /  whatsapp updates : व्हॉट्सअ‍ॅपवर जुने मेसेज शोधणं आता आणखी सोप्पं; आलं भन्नाट फीचर

whatsapp updates : व्हॉट्सअ‍ॅपवर जुने मेसेज शोधणं आता आणखी सोप्पं; आलं भन्नाट फीचर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 29, 2024 04:15 PM IST

Whatsapp Feature Updates : ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपनं आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे.

Whatsapp Updates
Whatsapp Updates

Whatsapp Feature Updates : जगातील सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सॲपनं आता युजर्ससाठी आणखी एक भन्नाट फीचर आणलं आहे. या फीचरमुळं व्हॉट्सॲपवरील जुने मेसेज शोधणं आता आणखी सोप्पं होणार आहे.

'सर्च बाय डेट' असं या फीचरचं नाव आहे. त्याच्या मदतीनं युजर्स कोणताही जुना मेसेज केवळ तारखेनुसार शोधू शकतील. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गनं यांनी स्वत:च्या व्हॉट्सॲप चॅनलवर या फीचरचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे नवीन फीचर सर्व यूजर्सना वापरता येणार आहे. हे फीचर मॅक डेस्कटॉप आणि व्हॉट्सॲप वेबवरही उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

तारखेनुसार असे शोधा व्हॉट्सॲप मेसेज

सर्व प्रथम वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा.

तुमच्या अँड्रॉइड फोनवरील सर्च फीचरमध्ये प्रवेश करण्यासाठी तीन डॉटवर टॅप करा.

आयफोनवर सर्च करण्यासाठी युजर्सना कॉण्टॅक्ट्स किंवा ग्रुपच्या नावावर टॅप करावं लागेल.

तुमच्या फोनमध्ये नवीन अपडेटेड व्हॉट्सॲप इन्स्टॉल असल्याची खात्री करा.

iOS मध्ये सर्च पर्याय उघडल्यानंतर तळाशी उजव्या बाजूला सर्च सिम्बॉल असलेले छोटे कॅलेंडर दिसेल.

त्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला तारीख पर्याय दिसेल. यानंतर तुम्ही तारीख, महिना आणि वर्ष टाकून मेसेज सर्च करू शकता.

फेवरेट कॉण्टॅक्ट्सचा पर्यायही येतोय!

व्हॉट्सॲपमध्ये लवकरच फेव्हरेट कॉन्टॅक्ट्स फीचर सुरू होणार आहे. हे फीचर ॲक्टिव्ह झाल्यानंतर युजरनं निवडलेले फेवरेट कॉण्टॅक्ट्स युजर्सच्या टॅबच्या शीर्षस्थानी दिसतील. इथं एका टॅपवर युजर त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी कनेक्ट होऊ शकेल. WABetaInfo नं व्हॉट्सॲपच्या या फीचरची माहिती दिली आहे. कंपनी सध्या या फीचरची चाचणी करत आहे. बीटा चाचणीनंतर हे फीचर सार्वत्रिक केलं जाईल.

WhatsApp channel

विभाग