व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं भन्नाट फीचर; कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग करताना आणखी मजा येणार!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं भन्नाट फीचर; कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग करताना आणखी मजा येणार!

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं भन्नाट फीचर; कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग करताना आणखी मजा येणार!

Dec 13, 2024 03:18 PM IST

WhatsApp: मेटाच्या मालकीच्या या मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपमध्ये भन्नाट फीचर आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं भन्नाट फीचर
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आलं भन्नाट फीचर

WhatsApp New Feature: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्सना अनेक फीचर्स अपडेट्स होत राहतात आणि त्यासोबत युजर्सलाही चॅटिंगचा चांगला अनुभव मिळतो. नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत, ज्यात कॉलिंगचा अनुभव अपग्रेड करण्यात आला आहे. नव्या फीचर्स नुसार कॉलिंग आता पूर्वीपेक्षा सोपे तर झाले आहेच, शिवाय त्याची गुणवत्ताही सुधारण्यात आली आहे. आता युजर्सना स्नॅपचॅटसारखे मजेदार फिल्टर आणि इफेक्ट्सही दिले जात आहेत.

व्हॉट्सअ‍ॅपने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून नव्या फीचर्सची माहिती दिली आहे. आता ग्रुप कॉलिंग पूर्वीपेक्षा चांगले झाले असल्याचे कंपनीने दावा केला आहे. संपूर्ण ग्रुपऐवजी निवडक ग्रुप मेंबर्सना व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करायचा असेल, तर हे देखील करता येईल. आता निवडक लोकांची निवड करून, बाकीच्या लोकांना त्रास न देता, त्यांना आपल्या ग्रुप कॉलचा भाग बनवता येईल, ज्यांच्यासोबत आपल्याला गप्पा मारायच्या आहेत.

याआधी मेसेजिंग प्लॅटफॉर्मला कॉलिंगदरम्यान ब्लर किंवा बॅकग्राऊंड सेट करण्याचा पर्याय देण्यात आला असून काही फिल्टर्सचाही समावेश करण्यात आला आहे. आता अनेक नवे फिल्टर व्हिडिओ कॉलचा भाग बनवले जात आहेत. स्नॅपचॅट अ‍ॅपप्रमाणेच या अ‍ॅपला १० वेगवेगळे इफेक्ट्स मिळत आहेत, ज्यामुळे चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव मजेदार होणार आहे.

डेस्कटॉप अ‍ॅपच्या माध्यमातून कॉल करू इच्छिणाऱ्या युजर्सना यासाठी एक वेगळा टॅब देण्यात आला आहे. या कॉल टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॉल सुरू करणे, कॉल लिंक जनरेट करणे किंवा थेट नंबर डायल करण्याचा पर्याय मिळेल. याव्यतिरिक्त, व्हॉट्सअ‍ॅपने कॉल क्वालिटी सुधारण्याचा ही दावा केला आहे. मेटाच्या मालकीच्या अ‍ॅपचा दावा आहे की, वापरकर्त्यांना मोबाइल आणि डेस्कटॉप दोन्हीकडे हाय-रिझोल्यूशन व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. सर्व नवीन फीचर्स स्टेबल व्हर्जनचा भाग बनवण्यात आले आहेत. या फिचर्सचा फायदा घेण्यासाठी अ‍ॅपला लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करावे लागेल.

व्हॉट्सअ‍ॅपने याआधी व्हॉईस मेसेजला क्विक रिप्लाय देण्याचे फीचर लॉन्च केले होते. अँड्रॉइड व्हर्जनप्रमाणेच युजर्संना व्हॉईस मेसेजवर क्विक रिप्लायचा पर्यायही देण्यात आला. रिपोर्टनुसार, युजर्सला मिळालेला व्हॉईस मेसेज ऐकायला सुरुवात होताच त्यांना क्विक रिप्लाईचा पर्याय दिसेल.युजर या बटणावर टॅप करून त्वरित व्हॉइस रिप्लाय रेकॉर्ड करून आणि पाठवू शकतात.

Whats_app_banner