whatsapp News feature : व्हॉट्सॲपनं स्टेटस अपडेटमध्ये केला मोठा बदल! युझर्सना आवडतोय नवा लूक
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  whatsapp News feature : व्हॉट्सॲपनं स्टेटस अपडेटमध्ये केला मोठा बदल! युझर्सना आवडतोय नवा लूक

whatsapp News feature : व्हॉट्सॲपनं स्टेटस अपडेटमध्ये केला मोठा बदल! युझर्सना आवडतोय नवा लूक

Updated Jun 25, 2024 11:54 AM IST

whatsapp News feature : व्हॉट्सॲपने स्टेटस अपडेट्समध्ये पुन्हा नवे बदल केले आहेत. नव्या डिझाईचे प्रिव्ह्यू फीचर अपडेट करण्यात आले असून यात शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये, स्क्रीनच्या उजव्या बाजूला छोटा फोटो दिसणार आहे. थंबनेलद्वारे, यूझर्स आता थेट स्टेटस अपडेट करू शकणार आहेत.

व्हॉट्सॲपनं स्टेटस अपडेटमध्ये केला मोठा बदल! युझर्सना आवडतोय नवा लूक
व्हॉट्सॲपनं स्टेटस अपडेटमध्ये केला मोठा बदल! युझर्सना आवडतोय नवा लूक (PTI)

whatsapp News feature : व्हॉट्सॲपने गेल्या काही दिवसांत स्टेटस अपडेटसाठी अनेक नवे फीचर्स आणले आहेत. यामध्ये स्टेटस अपडेट्समध्ये एक मिनिटाचा ऑडिओ आणि व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता कंपनी स्टेटस अपडेटच्या लूकमध्ये देखील मोठा बदल केला आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप स्टेटस अपडेट्ससाठी पुन्हा नव्याने डिझाइन केलेले प्रीव्ह्यू फीचर बाजारात आणले आहे. WABetaInfo ने या नव्या फीचरचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. यामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप स्टेटस अपडेटचा नवा लूक पाहता येणार आहे.

स्क्रीनच्या उजव्या बाजूला थमनेल

शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये, तुम्हाला स्क्रीनच्या उजव्या बाजूला एक छोटा फोटो दिसणार आहे. थमनेलच्या आकाराचा हा फोटो असणार आहे. या द्वारे स्टेटस अपडेटचे नवे फीचर वापरकर्ते एक्सप्लोर करू शकणार आहेत. नवीन स्टेटस अपडेट ट्रे विशेषत: व्हॉट्सॲप चॅनेल फीचर वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अपडेट टॅबचा पूर्ण लेआउट पाहता येणार आहे. जे व्हॉट्सॲप वापरणारे जर कोणतेही व्हॉट्सॲप चॅनल फॉलो करत नसतील तर त्यांना स्टेटस अपडेट हे त्यांच्या स्क्रीनवर उभे दिसतील. वापरकर्त्याला अधिक चांगला अनुभव देण्यासाठी कंपनीने प्रिव्ह्यू स्टेटस अपडेटमध्ये नवीन डिझाइन केलेले थंबनेल्स देखील जोडले आहेत.

व्हॉट्सॲपच्या मागील अपडेटमध्ये स्टॅबल व्हर्जन देखील आणण्याचा कंपनीचा विचार आहे. परंतु, युजर्सला स्टेटस अपडेटचा उभा लूक दिसत होता. परंतु प्रोफाइल फोटो बदलला असल्याने एकाच वेळी फोन मधील असणारे संपर्क ओळखणे कठीण होत होते. व्हॉट्सॲपच्या या नवीन अपडेट आल्यावर वापरकर्त्यांना प्रोफाइल फोटोसह एक थंबनेल देखील दिसेल, जे पूर्वीपेक्षा खूपच चांगल्या दर्जाचे आहे. हे नवीन फीचर WABetaInfo ने गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. तर Android Android 2.24.14.2 साठी WhatsApp बीटा मध्ये देखील हे फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या नव्या फीचरची नवी स्थिर आवृत्ती जी बीटा वापरकर्त्यांसाठी देखील लवकरक आणली जाणार आहे.

Whats_app_banner