WhatsApp new Feature: व्हॉट्सअॅप एकापाठोपाठ एक नवनवीन फीचर्स आणत आहे. कंपनी आपल्या नवीन फीचर्ससह युजर्सचा चॅटिंगचा अनुभव अधिक मजेदार बनवत आहे. यापूर्वी कंपनीने व्हिडिओ मेसेजचे क्विक रिप्लाय फीचर रोलआउट केले होते. आता कंपनी व्हिडिओशी संबंधित एक नवीन फीचर घेऊन आली आहे. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरबद्दल डब्ल्यूएबीटाइन्फोने माहिती दिली आहे. कॅमेरा व्हिडिओ नोट असे या फीचरचे नाव आहे. व्हॉट्सअॅपमधील या नव्या फीचरमुळे युजर्सना चॅटमधील कंटेंट शेअर करण्यासाठी नवा कॅमेरा मोड मिळणार आहे. या मोडच्या मदतीने युजर्स व्हॉट्सअॅप कॅमेरा इंटरफेसमध्ये व्हिडिओ नोट्स रेकॉर्ड करू शकतील.
आतापर्यंत युजर्सला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी चॅट बारमध्ये दिलेला कॅमेरा आयकॉन टॅप करून धरून ठेवावा लागत होता. नव्या फीचरमुळे हा गोंधळ पूर्णपणे दूर होणार आहे. डब्ल्यूएबेटाइन्फोने एक्स पोस्ट करून या फीचरची माहिती दिली आहे. यात नव्या फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर करण्यात आला आहे. कंपनी सध्या अँड्रॉइड २.२४.१४.१४ साठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये हे फीचर रोलआउट करत आहे. बीटा चाचणीनंतर हे फीचर्स ग्लोबल युजर्ससाठी रोलआउट केले जाईल.
डब्ल्यूएबीटाइन्फोनुसार, कंपनी वापरकर्त्यांना अँड्रॉइड २.२४.१४.५ साठी व्हॉट्सअॅप बीटामध्ये व्हिडिओ मॅसेज त्वरित उत्तर देण्याचे फीचर्स देत आहे. अपडेटमध्ये व्हिडिओ मेसेजच्या पुढे शॉर्टकट आयकॉन देण्यात आला आहे. त्यावर टॅप करून बीटा युजर्स व्हिडिओ मेसेजला लगेच रिप्लाय देऊ शकतात. याशिवाय, कंपनी युजर्सना हावभावांसह व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पर्यायही देत आहे.
पहिल्या अपडेटमध्ये कंपनीने मेसेज मेन्यूमध्ये जाऊन मॅन्युअल रिप्लायचा पर्याय दिला होता, जो आता लवकरच बदलणार आहे. कंपनी सध्या या नव्या फीचरची बीटा टेस्टिंग करत आहे. बीटा चाचणीनंतर हे फीचर्स ग्लोबल युजर्ससाठी रोलआउट केले जाईल.
व्हॉट्सअप सर्वात प्रथम नोव्हेंबर २००९ मध्ये आयओएस व्हर्जनसाठी लॉन्च झाले. त्यानंतर जानेवारी २०१० ब्लॅकबेरी स्मार्टफोनसाठी सुरू झाले आणि ऑगस्ट २०१० मध्ये अँड्रॉइड स्मार्टफोन वापरकर्ते व्हॉट्सअपचा आनंद घेऊ शकले. २०२४ मध्ये भारतात सर्वाधिक ५३५.८ दशलक्ष व्हॉट्सअप वापरकर्ते आहेत. दरवर्षी ही संख्या १६.६ टक्केच्या दराने वाढताना दिसत आहेत.