WhatsApp News : व्हॉट्सॲपशी पंगा घेणे पडले महागात! ३० दिवसांत ७१ लाखांहून अधिक भारतीयांचे अकाऊंट केले डिलीट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  WhatsApp News : व्हॉट्सॲपशी पंगा घेणे पडले महागात! ३० दिवसांत ७१ लाखांहून अधिक भारतीयांचे अकाऊंट केले डिलीट

WhatsApp News : व्हॉट्सॲपशी पंगा घेणे पडले महागात! ३० दिवसांत ७१ लाखांहून अधिक भारतीयांचे अकाऊंट केले डिलीट

Updated Jun 03, 2024 04:22 PM IST

WhatsApp News : व्हॉट्सॲपने गेल्या ३० दिवसांत ७१ लाखांहून अधिक भारतीयांचे अकाऊंट बॅन केले आहे. या बाबत खुद्द कंपनीनेच माहिती दिली आहे.

व्हॉट्सॲपने गेल्या ३० दिवसांत ७१ लाखांहून अधिक भारतीयांचे अकाऊंट बॅन केले आहे.
व्हॉट्सॲपने गेल्या ३० दिवसांत ७१ लाखांहून अधिक भारतीयांचे अकाऊंट बॅन केले आहे.

WhatsApp News : व्हॉट्सॲपने ३० दिवसांत ७१ लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली आहे. खुद्द कंपनीनेच या बाबत माहिती दिली आहे. खरं तर, मेटाच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपने एप्रिल २०२४ मध्ये ही कारवाई करत व्हॉट्सॲपवरील ७१ लाखांहून अधिक भारतीय खात्यांवर बंदी घातली होती. भारतीय कायद्यांचे उल्लंघन करणरी ही खाती असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. व्हॉट्सॲप मेसेजिंग प्लॅटफॉर्म आयटी नियम, २०२१ अंतर्गत मासिक अहवाल प्रकाशित करते. या अहवालात, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारींवर केलेल्या कारवाईची आणि ती शोधणे तसेच प्रतिबंध करण्याबाबतची माहिती कंपनीमार्फत शेअर केली जाते. यात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Mumbai Bomb Blast : मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आरोपीचा तुरुंगात खून, ५ कैद्यांनी बेदम मारहाण करून केली हत्या

कंपनीकडे प्राप्त झाल्या १०,५५४ तक्रारी

१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हे अकाउंट डिलीट करण्यात आले आहे. या कारवाईबाबतच्या अहवालानुसार वापरकर्ते त्यांच्या तक्रारी ई-मेल किंवा पोस्टद्वारे भारतीय तक्रार अधिकाऱ्यांकडे पाठवू शकतात. एप्रिलमध्ये, कंपनीला बंदी अपील, सुरक्षा, खाते समर्थन आणि इतर गोष्टींबाबत १०,५५४ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देण्याव्यतिरिक्त, कंपनी व्हॉट्सॲपवर "हानीकारक मजकूर टाळण्यासाठी विविध साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करते.

LS results 2024 : सोनिया गांधी म्हणतात, लोकसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलच्या नेमके उलट लागतील! आम्ही आशावादी!

अनेक यूझर्स हे व्हॉट्सॲपचा गैर वापर करत असतात. त्यामुळे नव्या आयटी कायद्या अंतर्गत अशी खाती शोधून ती रद्द करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. व्हॉट्सॲपचा गैरवापर करणारी खाते शोधण्यासाठी तीन टप्प्यांवर काम केले जाते. ॲप नोंदणी करताना, मेसेजिंग दरम्यान आणि नकारात्मक फीडबॅकच्या प्रतिसाद देतांना वापरकर्ता अहवाल आणि ब्लॉक्सच्या स्वरूपात माहिती प्राप्त होते. व्हॉट्सॲप विश्लेषकांची टीम ही या प्रणालीचा वापर करून बनावट खाती शोधून ते डिलीत करते.

दुबईला जाण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं, पासपोर्ट व्हेरिफिकेशननंतर घरी येताना डंपरनं उडवलं, महिलेचा मृत्यू

एकूण ७१ लाख ८२ हजार भारतीय खात्यांवर बंदी

प्रतिबंधित खात्यांच्या संख्येमध्ये या यंत्रणेद्वारे मिळालेल्या रिपोर्टमध्ये विविध वैशिष्ट्याद्वारे वापरकर्त्यांकडून मिळालेल्या नकारात्मक अभिप्रायानंतर केलेल्या कारवाईचाही समावेश आहे," असे कंपनीने म्हटले आहे. भारतात एकूण ७१,८२,००० भारतीय खात्यांवर बंदी घालण्यात आली होती. यापैकी १३,०२,००० खाती वापरकर्त्यांचा कोणताही अहवाल येण्यापूर्वीच बॅन करण्यात आली होती. भारतीय खाते '+९१' फोन क्रमांकाद्वारे ओळखले जातात.

याव्यतिरिक्त, व्हाट्सएपमध्ये "अभियंता, डेटा शास्त्रज्ञ, विश्लेषक, संशोधक आणि कायदा तज्ञ, ऑनलाइन सुरक्षा आणि तंत्रज्ञान विकास तज्ञांची एक टीम आहे जे ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी." याव्यतिरिक्त, कंपनी एंड-टू-एंड एनक्रिप्टेड मेसेजिंग प्रणालीचा देखील वापर करते.

 

 

Whats_app_banner