ITR Refund status : आतापर्यंत ७.५० कोटींहून अधिक लोकांनी आयटीआर भरला आहे. शेवटची तारीख उलटून गेल्यानंतर करदाते आता रिफंड मिळण्याची वाट बघत आहेत. रिफंड मिळण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे उशीर लागत नसला तरी काही कारणांमुळं रिफंड रखडू शकतो.
इन्कम टॅक्स रिफंड रखडण्याची कारणं नेमकी काय आहेत? परताव्याची स्थिती कशी तपासावी? परताव्याला उशीर झाल्यास काय करावं आणि परताव्याचा दावा फेटाळल्यास काय करावं? या सगळ्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया…
१. अचूक आयटीआर तपशील आणि योग्य बँक खाते तपशील दिल्याची खात्री करा.
२. आधार ओटीपी, नेट बँकिंग किंवा फिजिकल कॉपीद्वारे आयटीआरची पडताळणी करा.
३. नोंदणीकृत ईमेल आणि ई-फायलिंग पोर्टलद्वारे प्राप्तिकर विभागाकडून मिळालेली नोटीस तपासा.
४. काही विसंगती किंवा त्रुटी आढळल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम १५४ अन्वये दुरुस्तीची विनंती दाखल करा.
५. वेळेवर नोटिफिकेशनसाठी बँक खाते आणि बँक स्टेटमेंटद्वारे परतावा ट्रॅक करा.
प्राप्तिकर विभागाच्या www.incometax.gov.in या पोर्टलला भेट द्या. यूजर आयडी, पॅन नंबर आणि पासवर्ड टाका व लॉग इन करा,
माय अकाउंटवर क्लिक करा आणि परतावा / मागणी स्टेटस उघडा. इथं प्राप्तिकर विवरणपत्र प्रकार निवडा.
आता पावती नंबरवर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, जिथं आयटीआरशी संबंधित सर्व माहिती दिसेल.
प्रथम आपला ई-मेल तपासा. प्राप्तिकर विभाग ई-मेलद्वारे परतावा किंवा कोणतीही अतिरिक्त माहिती किंवा नोटीस पाठवतो.
परताव्याचा दावा फेटाळण्यात आल्याचं आयटीआर स्टेटसमध्ये दिसून आल्यास करदाते पुन्हा परतावा देण्याची विनंती करू शकतात.
दावा प्रलंबित असल्यास, आपण ई-फायलिंग पोर्टल / मूल्यांकन अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता आणि त्याचा लवकर निपटारा करण्याची विनंती करू शकता.
आयकर विभागाशी संपर्क साधा
१८००-१०३-४४५५ या क्रमांकावर फोन करून किंवा ask@incometax.gov.in वर ईमेल करून प्राप्तिकर विभागाच्या हेल्पलाइनशी संपर्क साधू शकता. ते तुम्हाला रिफंडची स्थिती काय आहे हे सांगण्यास मदत करू शकतात.
स्थानिक प्राप्तिकर कार्यालयाला भेट द्या!
रिफंड अजूनही रखडलेला असल्यास थेट स्थानिक प्राप्तिकर कार्यालयात जाऊन परताव्याची स्थिती जाणून घेता येईल. आपल्या विवरणपत्राशी संबंधित आवश्यक कागदपत्रं सोबत न्या.
१. बँक खात्याचा चुकीचा तपशील टाकलेला असल्यास
२ . बँक अकाऊंट व्हेरिफाइड केलेलं नसल्यास
३. आयटीआरमध्ये योग्य माहिती दिलेली नसल्यास
४. प्राप्तिकर विभागाकडून आयटीआरची छाननी झालेली नसल्यास
५. मागील कर भरलेला नसल्यास
१. प्राप्तिकर विभागाच्या पोर्टलवर लॉगिन करा (www.incometax.gov.in) इथं सर्व्हिसेस टॅबवर क्लिक करा आणि रिफंड रिइश्यू पर्याय निवडा.
२. रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट बटणावर क्लिक करा (करदात्याचा परतावा दावा फेटाळला गेला तरच हा टॅब अॅक्टिव्हेट होतो)
३. आता क्रिएट रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट पर्याय निवडा. बॉक्सवर टिक करा आणि पावती क्रमांक प्रमाणित करा. त्यानंतर कंटिन्यू बटण दाबा.
४. तुम्हाला ज्या बँकेत परताव्याचे पैसे हवे आहेत, त्या बँकेचं नाव तपासा. बॉक्सवर टिक करा आणि प्रोसीड टू व्हेरिफिकेशनवर क्लिक करा. परताव्याचे पैसे व्हेरिफाइड बँक खात्यातच येतील.
५. करदात्याला आपला विद्यमान बँक खाते क्रमांक आणि शाखेचा आयएफएससी कोड द्यावा लागेल. आधार ओटीपीसह डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्राची ई-पडताळणी करा.
६. यानंतर एक मेसेज दिसेल, ज्यावर सबमिट सक्सेस लिहिलं जाईल. यात ट्रान्झॅक्शन आयडीही असेल. व्ह्यू रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट वर क्लिक करून तुम्ही त्याची स्थिती तपासू शकता.