मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SIP investment : एसआयपी गुंतवणूकीला सुरुवात करा ५०० रुपयांपासून, ‘असा’ मिळेल परतावा !

SIP investment : एसआयपी गुंतवणूकीला सुरुवात करा ५०० रुपयांपासून, ‘असा’ मिळेल परतावा !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 09, 2022 12:10 PM IST

ठराविक मुदतीनंतर नियमितपणे, शिस्तबद्धपणे एयसआयपीत गुंतवणूक करता येते. जोखीम मुक्त सुरक्षित परतावा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना यातून मिळू शकतो. कशी करावी एसआयपीतील गुंतवणूक, आॅनलाईन एसआयपी कशी कराल आणि कोणती एसआयपी ठरेल फायद्याची... हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

SIP Investment HT
SIP Investment HT

म्युच्युअल फंडातल्या गुंतवणूकीतील एक प्रकार म्हणजे एसआयपी. ठराविक मुदतीनंतर लोक नियमितपणे, शिस्तबद्धपणे एसआयपीत गुंतवणूक करता येते. जोखीम मुक्त सुरक्षित परतावा सर्वसामान्य गुंतवणूकदारांना यातून मिळू शकतो. किंबहुना ज्या व्यक्तींना पहिल्यांदाच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी एसआयपी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. कशी करावी एसआयपीतील गुंतवणूक, आॅनलाईन एसआयपी कशी कराल आणि कोणती एसआयपी ठरेल फायद्याची हे आपण आज पाहणार आहोत.

एसआयपी म्हणजे काय ?

एसआयपी गुंतवणूक हा म्युच्युअल फंडातील एक पद्धतशीर गुंतवणूक आहे. यातील कमी धोका आणि सुरक्षितता या दोन घटकांमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारही एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. भविष्यातील आर्थिक गुंतवणूकीच्या दृष्टीने एसआपी हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

एसआयपी कशी निवडाल ?

एसआयपी निवडताना जी रक्कम गुंतवायची आहे, त्याची भविष्यातील लक्ष्य रक्कम ठरवून हे करता येते. यासाठी एसआयपी कॅलक्युलेटर उपयोगी पडते. एसआयपीतील गुंतवणूक ही ५०० रुपयांपासून सुरु करता येते. उदाहरणार्थ प्रति महा ५०० रुपयांची केलेली गुंतवणूक ही १० लाखांपर्यंतही वाढू शकते. एसआयपी म्युच्युअल फंड साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिकही करता येते. कोणत्याही एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना ती दीर्घकालीन करणे अधिक फायद्याचे ठरते.

एसआयपी कसे काम करते

एसआयपीत गुंतवणूक करण्यापूर्वी ती कशी काम करते हेदेखील जाणून घेणे गरजेचे आहे.

- (SIP) तील गुंतवणूक तुम्हाला मार्केट अस्थिरता टाळण्यास मदत करू शकतात. एसआयपीमध्ये दीर्घकाळात, नियमित इन्व्हेस्टिंगची हमी मिळते.

- एसआयपीमधील कम्पाउंडिंग परिणामामुळे, दीर्घ कालावधीसाठी मासिक आधारावर लहान रक्कम बचत करणे तुमच्या गुंतवणूकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकते. दीर्घ कालावधीसाठी नियमित गुंतवणूक उच्च रिटर्न आणि नफा प्रदान करते.

एसआयपीचा फायदा

छोट्या रकमेतील गुंतवणूक, एसआयपीमधील गुंतवणूकीतील शिस्तबद्धता आणि सुलभता, कमीत कमी जोखीम, पैसे काढण्याची सुलभता, चक्रवाढ व्याजाने परतावा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एसआयपीवर मिळणारी करसवलत यांमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारही याकडे वळू लागला आहे.

कोणत्या एसआयपी ठरतील फायद्याच्या

मिराई असेस्ट्स ब्यू चीप फंड्स

एडलवाईज लार्ज अँड मिडकॅप फंड्स

कोटक इक्विटी अपाॅच्युनिटी फंड

डीएसपी फ्लेक्सी कॅप फंड

एसबीआय फोकस इक्विटी फंड

यूटीआय़ फ्लेक्सी कॅप फंड

अॅक्सिस ब्यूचीप फंड्स

मोतीलाल ओसवाल फोकस फंड्स

पीजीआयएम इंडिया फ्लेक्सी कॅप फंड्स

सुंदरम फोक्स्ड फंड

((डिस्‍क्‍लेमर: वर नमूद केलेल्या एसआयपी फंडाची माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग