Sarkari Yojana : काय आहे जनधन योजना? कोण उघडू शकतो जनधन खातं? काय मिळतात फायदे? जाणून घ्या!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sarkari Yojana : काय आहे जनधन योजना? कोण उघडू शकतो जनधन खातं? काय मिळतात फायदे? जाणून घ्या!

Sarkari Yojana : काय आहे जनधन योजना? कोण उघडू शकतो जनधन खातं? काय मिळतात फायदे? जाणून घ्या!

Updated Jul 04, 2024 06:20 PM IST

PM Jan Dhan Yojana details : केंद्र सरकारनं २०१४ साली सुरू केलेली पंतप्रधान जन धन योजनेविषयी जाणून घेऊया संपूर्ण माहिती

काय आहे जनधन योजना? कोण उघडू शकतो जनधन खातं? काय मिळतात फायदे? जाणून घ्या!
काय आहे जनधन योजना? कोण उघडू शकतो जनधन खातं? काय मिळतात फायदे? जाणून घ्या!

PM Jan Dhan Yojana details : देशातील सर्व नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५ कोटींहून अधिक लोकांनी जन धन खाती उघडली आहेत. या योजनेअंतर्गत कोण खाती उघडू शकतो? योजनेत सहभागी झाल्यामुळं काय फायदे होतात? हे समजून घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती

कोण उघडू शकतो जनधन खाते?

ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली. कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत जन धन खातं उघडावं लागतं. कोणत्याही सरकारी बँकेत वा सरकारनं मान्यता दिलेल्या खासगी बँकेत हे खातं उघडता येतं. वंचित व मागासलेल्या लोकांचा बँकिंग व्यवस्थेशी किमान परिचय व्हावा हा योजनेचा हेतू आहे. जनधन खात्याचं व्यवस्थापन इतर खात्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं केलं जातं.

हे झिरो बॅलन्स खातं आहे. म्हणजेच, हे खातं उघडताना कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. याशिवाय, खातेदाराला या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याचीही गरज लागत नाही.

प्रधानमंत्री जन धन योजनेचे फायदे

गरीब वर्गातील लोकांनाही बँकिंग प्रणालीशी जोडता आलं पाहिजे हा या योजनेचा उद्देश आहे. यामध्ये सरकारकडून देण्यात येणाऱ्या शासकीय अनुदानाची रक्कम आणि शासकीय योजनांचा थेट समावेश करण्यात आला आहे. या खात्यात कोणीही कितीही रक्कम सहज जमा करू शकतो आणि काढू शकतो. याशिवाय या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल व्यक्तींना विमा योजनेचा लाभ मिळतो.

या जनधन खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याजदराचा लाभही दिला जातो. याशिवाय खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड मिळते. त्याच वेळी, खातेदार १० हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टसाठी (OD) देखील पात्र आहे.

कोणत्या योजना लाभ देतात?

जन धन खातेधारकांना (PMJDY) सरकारच्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer - DBT) सुविधेचाही लाभ मिळतो. यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (Atak Pension Yojana - APY), मुद्रा योजना (Micro Units Development & Refinance Agency Bank - MUDRA ) यांसारख्या अनेक योजनांद्वारे आलेले पैसे थेट खात्यात जमा केले जातात.

Whats_app_banner