Pm Vishwakarma Yojana : अवघ्या ५ टक्क्यांत कर्ज मिळवून देणारी विश्वकर्मा योजना नेमकी आहे काय?
PM Vishwakarma Yojana : पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अवघ्या ५ टक्क्यांना ३ लाखांचं कर्ज देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे.
PM Vishwakarma Yojana : देशातील कुशल कारागिरांना केंद्र सरकारनं मोठी बातमी दिली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना आता केवळ ५ टक्के व्याजदरात कर्ज मिळणार आहे. केंद्र सरकार या कर्जावर तब्बल ८ टक्क्यांपर्यंत सबसिडी देणार आहे. त्यामुळं कर्जाची गरज असलेल्या कुशल कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, १७ सप्टेंबर रोजी कारागिरांसाठी विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेवर तब्बल १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कोणाला, कसा होणार फायदा?
सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, कुंभार, टाळे बनविणारे, दगडी शिल्पकार, नाभिक, मासेमारीची जाळी बनविणारे आणि लाकडी होड्या बनवणाऱ्यांसह १८ कामांमध्ये गुंतलेल्या कुशल कारागिरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. एखाद्या कुशल कारागिराला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्याला भांडवल उभं करायला अडचण येतेय, अशा व्यक्तीला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे. या योजनेमध्ये आर्थिक मदतीसोबतच आगाऊ कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचं अद्ययावत ज्ञान, डिजिटल पेमेंट, जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेशी जोडून घेण्यासाठी मदत आणि उत्पादनांचं ब्रँडिंग अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत.
कसं मिळेल कर्ज?
विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुरुवातीला एक लाख रुपयांचं कर्ज दिलं जाईल. लाभार्थ्यानं कर्जाची परतफेड करताच त्याला अतिरिक्त २ लाख रुपये दिले जातील. म्हणजेच, कारागिरांना अवघ्या ५ टक्क्यांत ३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. हे कर्ज घेण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.
कौशल्य प्रशिक्षणाबरोबर विद्यावेतनही मिळणार
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत ५ दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर दिवसाला ५०० रुपये भत्ता मिळणार आहे. याशिवाय, १५ हजार रुपयांचा टूलकिट प्रोत्साहन भत्ता, पीएम विश्वकर्मा योजनेचं प्रमाणपत्र, आयकार्ड हेही दिलं जाईल. डिजिटल व्यवहार करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन म्हणून १०० व्यवहारांपर्यंत प्रति व्यवहार १ रुपया प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
PM Vishwakarma Yojana : देशातील कुशल कारागिरांना केंद्र सरकारनं मोठी बातमी दिली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना आता केवळ ५ टक्के व्याजदरात कर्ज मिळणार आहे. केंद्र सरकार या कर्जावर तब्बल ८ टक्क्यांपर्यंत सबसिडी देणार आहे. त्यामुळं कर्जाची गरज असलेल्या कुशल कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, १७ सप्टेंबर रोजी कारागिरांसाठी विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेवर तब्बल १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कोणाला, कसा होणार फायदा?
सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, कुंभार, टाळे बनविणारे, दगडी शिल्पकार, नाभिक, मासेमारीची जाळी बनविणारे आणि लाकडी होड्या बनवणाऱ्यांसह १८ कामांमध्ये गुंतलेल्या कुशल कारागिरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. एखाद्या कुशल कारागिराला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्याला भांडवल उभं करायला अडचण येतेय, अशा व्यक्तीला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे. या योजनेमध्ये आर्थिक मदतीसोबतच आगाऊ कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचं अद्ययावत ज्ञान, डिजिटल पेमेंट, जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेशी जोडून घेण्यासाठी मदत आणि उत्पादनांचं ब्रँडिंग अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत.
कसं मिळेल कर्ज?
विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुरुवातीला एक लाख रुपयांचं कर्ज दिलं जाईल. लाभार्थ्यानं कर्जाची परतफेड करताच त्याला अतिरिक्त २ लाख रुपये दिले जातील. म्हणजेच, कारागिरांना अवघ्या ५ टक्क्यांत ३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. हे कर्ज घेण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.
कौशल्य प्रशिक्षणाबरोबर विद्यावेतनही मिळणार
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत ५ दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर दिवसाला ५०० रुपये भत्ता मिळणार आहे. याशिवाय, १५ हजार रुपयांचा टूलकिट प्रोत्साहन भत्ता, पीएम विश्वकर्मा योजनेचं प्रमाणपत्र, आयकार्ड हेही दिलं जाईल. डिजिटल व्यवहार करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन म्हणून १०० व्यवहारांपर्यंत प्रति व्यवहार १ रुपया प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.|#+|
विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता काय?
कर्जासाठी अर्ज करणारा भारतीय नागरिक असावा.
योजनेत समाविष्ट असलेल्या १८ व्यवसायांपैकी कुठल्याही एका व्यवसायाशी संबंधित असावा.
अर्जदाराचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त व ५० वर्षांपेक्षा कमी असावं.
संबंधित व्यवसायाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक
ही कागदपत्रे लागणार?
पॅन कार्ड
आधार कार्ड
उत्पन्नाचा दाखला
जातीचा दाखला
ओळखपत्र
निवासाचा पत्ता
पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक पासबुक
योग्य मोबाइल नंबर
असा करा अर्ज
pmvishwakarma.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होम पेजवर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना दिसेल.
Apply Online पर्यायावर क्लिक करा.
आता नाव नोंदणी करा
नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाइलवर एसएमएसद्वारे येईल.
नोंदणी फॉर्म पूर्णपणे वाचा आणि भरा.
भरलेल्या फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा.