IndiGo airlines : इंडिगो (IndiGo) विमानातून प्रवास करणाऱ्या एका सोशल मीडिया यूजरने एअरलाइनला सवाल करत पोस्ट केली आहे. त्यानंतर इंटरनेटवर याची चर्चा सुरू झाली आहे. 'X' वर पोस्ट करताना यूजरने एयरलाइनला विचारले आहे की, त्याच्याकडून बसूल करण्यात आलेला 'क्यूट चार्ज' काय आहे. श्रेयांश सिंह नावाच्या सोशल मीडिया यूजरने पोस्टमध्ये आपल्या विमानप्रवासाच्या तिकीटाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, एअरलाईन्सनने प्रवास भाड्याशिवाय ५० रुपये 'क्यूट चार्ज' रुपात वसूल केले आहेत.
यूजरने पोस्टमध्ये लिहिले की, तिकीट भाड्याच्या ब्रेकअपमध्ये ५० रुपयांच्या पुढे 'क्यूट चार्ज' लिहिले आहे. स्क्रीनशॉट शेअर करताना यूजरने लिहिले की, "प्रिय IndiGo6E, ही 'क्यूट फीस' काय आहे? तुम्ही क्यूट असल्याने यूजरकडून पैसे घेणार का? का तुम्ही यासाठी पैसे घेता की, तुमचे विमान क्यूट आहे?
एका वकिलाने इंडिगोला 'क्यूट फी'बाबत दिलेल्या एक्स पोस्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. केवळ त्या व्यक्तीच्या पोस्टनेच लोकांना भुरळ घातली नाही, तर एअरलाइन्सने या आरोपाचे स्पष्टीकरण देताना दिलेल्या प्रतिक्रियेवरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
"प्रिय इंडिगो, ही 'क्यूट फी' काय आहे? क्यूट असल्याबद्दल तुम्ही युजर्सकडून शुल्क आकारता का? किंवा तुमची विमानं क्युट आहेत असं तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही शुल्क आकारता का?" एक्स युजर आणि अॅडव्होकेट श्रायांश सिंह यांनी लिहिलं आहे. त्यांनी संताप व्यक्त करताना 'युजर डेव्हलपमेंट फी' आणि 'एव्हिएशन सिक्युरिटी फी'बाबतही विचारणा केली.
"हाय, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की क्यूट चार्जेस कॉमन युजर टर्मिनल इक्विपमेंट चार्जचा संदर्भ देतात. मुळात विमानतळावर वापरल्या जाणाऱ्या मेटल डिटेक्टिंग मशिन, एस्केलेटर आणि इतर उपकरणांच्या वापरासाठी ही रक्कम आकारली जाते, असे एअरलाइन्सने उत्तर दिले.
या उत्तरावर सिंह म्हणाले, 'हा विमानतळ सुरक्षेचा भाग नाही का? मेटल डिटेक्टर ही विमानतळांच्या सुरक्षेसाठी सरकारची सुरक्षा संस्था असलेल्या सीआयएसएफची मालमत्ता नाही का? विमानतळाच्या इमारतींसह विमानतळावर वापरली जाणारी उपकरणे ही लोकोपयोगी पायाभूत सुविधा आहेत. आम्ही भरलेल्या करातून त्यांची देखभाल होणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.
शेअर झाल्यापासून या व्हायरल पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्या व्यक्तीची बाजू घेतली, तर काहींनी विमान कंपनीला पाठिंबा दर्शविला.
पेट्रोल पंपावरील इंधन नोझलसाठी पुढे काय वापर शुल्क आकारले जाते, असा प्रश्न पडतो. ओह सॉरी मी त्यांना अशा प्रकारे आयडिया देऊ नये," असं एका एक्स युजरने पोस्ट केलं आहे.
"श्वासोच्छवासाच्या चार्जेसचे काय? एअरपोर्ट आणि विमानात प्रवासी ऑक्सिजनचा श्वास घेत आहे का? हा टॅक्स ब्रेकअप कुठे आहे?", असा सवाल आणखी एकाने केला.
तिसर् याने कमेंट केली की, "जेव्हा कोणी अचानक बसच्या तिकिटाऐवजी एअर तिकीट विकत घेते तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात. सीआयएसएफ अमेरिकेप्रमाणे विनामूल्य सेवा देत नाही. अनेक देशांमध्ये यूडीएफ/पीडीएफ आणि क्यूट चार्जेसऐवजी एअरपोर्ट टॅक्सचा वापर केला जातो.
चौथ्या ने लिहिलं, "इथे विमान कंपन्यांना दोष द्यायचा नाही. सीयूटी / वापरकर्ता विकास शुल्क / प्रवासी सेवा शुल्क हे सर्व विमानतळांची देखभाल करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाद्वारे आकारले जातात. विमान कंपन्या केवळ एजंट म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्याकडून तिकिटांच्या किंमती गोळा करत आहेत, जे त्यांना गोळा करण्याचे अधिकार आहेत.