Bima Sugam : काय आहे विमा सुगम आणि हेल्थ एक्सचेंज? ऑगस्टपासून होणार सुरुवात, जाणून घ्या फायदे
Bima Sugam : दोन आॅनलाईन प्लॅटफाॅर्म - हेल्थ क्लेम एक्सेंज आणि विमा सुगम सुरू केले जाणार आहेत. दोन्ही आॅनलाईन प्लॅटफाॅर्मवर पाॅलिसीधारकांना सर्व प्रकारची सुविधा मिळणार आहे. इर्डाने येत्या १ आॅगस्टपासून या योजनेची सुरुवात होणार असल्याची घोषणा केली आहे.
Bima Sugam : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) लवकरच पाॅलिसीधारकांसाठी दोन मोठ्या सुविधा सुरू करणार आहे. या अंतर्गत दोन ऑनलाईन प्लॅटफाॅर्म हेल्थ क्लेम्स एक्सेंज आणि विमा सुगम सुरू करण्यात येतील. याच्या मदतीने विमा खरेदीपासून ते दावे निकाली काढेपर्यंतच्या सर्व प्रकरणे हाताळली जातील. इर्डाने एक ऑगस्ट २०२३ पासून या नव्या सुविधा सुरू करण्याची तयारी केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
इरडाचे अध्यक्ष देबाशीष पांडा यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या योजना लवकरच लागू करण्यासंदर्भात त्यांच्यात एकमत झाले. यात विमा सुगम योजनेला अंतिम रुप देण्यात आले आहे. तर हेल्थ एक्सेंजला लवकरच अंतिम रुप दिले जाईल.
विमा सुगम काय आहे
हे एक आॅनलाईन पोर्टल आहे, ज्यावर इर्डा काम करत आहे. इथे सर्व प्रकारच्या विमा पाॅलिसींचा समावेश असेल. इथे ग्राहक आपल्या गरजेनुसार विमा पाॅलिसी खरेदी करु शकेल. विमा सुगमच्या माध्यमातून विमा उत्पादन आणि सेवांना सर्वात मोठे आॅनलाईन व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. या प्लॅटफाॅर्मवक सर्व प्रकारचा विमा खरेदी, दावा निकाली काढणे, विमा एजंट्ससारख्या सुविधा असतील.
ई इन्शुरन्स खाते
विमा धारकांना प्रत्यक्ष विमा पाँलिसीची हार्ड काँपी स्वतः जवळ बाळगण्याची आवश्यकता नाही. सर्व संबंधित दस्तावेज यात ठेवता येणार आहे. सर्व पेपरलेस विमा पाँलिसी एकाच छताखाली पडताळता येणार आहेत. सरकारी तसेच खाजगी विमा पाँलिसीही इच्छुक विमा धारकाला‘विमा सुगम’द्वारे खरेदी करता येतील. एखाद्या डी-मॅट खात्याप्रमाणे हे ई-पाँलिसी खाते काम करणार आहे.
असा होईल फायदा
- ई इन्शुरन्स खात्यात जीवन, वाहन, आरोग्य सहित सर्व प्रकारचे विमा पाहता येतील
- सर्व पाॅलिसीच्या देवाणघेवाण आणि दस्तावेजांसहित इतर माहिती एकाच स्थानी उपलब्ध होईल.
- पाॅलिसी सुरु आणि संपण्याची तारीख, नामांकनासहित इतर माहिती मिळेल
- पाॅलिसीची हार्ड काॅपी ठेवण्याची गरज नाही.
हेल्थ एक्सेंज काय आहे
याला राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाद्वारे सुरु केले जाणार आहे. ही एक आयुष्यमान भारत डिजीटल मिशनचा भाग आहे. प्रस्तावित हेल्थ एक्सेंजद्वारे दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ केली जाईल. पाॅलिसीधारक आणि रुग्णालयातील दाव्यांची स्थिती आॅनलाईन ट्रॅक केला जाईल. यामुळे व्यवहारात अधिक पारदर्शकता येईल.
संबंधित बातम्या