मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Weekly stocks to buy : नव्या आठवड्यात धातू क्षेत्रातील हे स्टाॅक्स करतील मालामाल, तुम्ही खरेदी करणार का ?

Weekly stocks to buy : नव्या आठवड्यात धातू क्षेत्रातील हे स्टाॅक्स करतील मालामाल, तुम्ही खरेदी करणार का ?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 28, 2023 07:34 PM IST

Weekly stocks to buy : नव्या आठवड्यात मेटल सेक्टरमधील हे चार स्टाॅक्स गुंतवणूकदारांसाठी अधिक फायद्याचे ठरतील असे सुतोवाच शेअर बाजार विश्लेषकांनी केले आहे. जाणून घ्या त्याबद्दल -

weekly stocks to buy HT
weekly stocks to buy HT

Weekly stocks to buy : शेअर बाजार तज्ज्ञांनी येत्या ३ महिन्यांत हे सर्व स्टॉक्स २०% पेक्षा अधिक परतावा देऊ शकतात, असे सुतोवाच केले आहे. त्यात प्रामुख्याने जिंदाल स्टील, हिंदाल्को, टाटा स्टील, हिंदुस्थान कॉपर यांना पसंती दिली आहे. चिनी अर्थव्यवस्थेतील खर्च पुन्हा वाढू लागले आहेत. त्याचा फायदा मेटल सेक्टरमधील या कंपन्यांच्या शेअर्सना होणार आहे.

पिरामल फार्मा

फार्मा क्षेत्राशी संबंधित असलेल्या पिरामल फार्मा स्टॉक येत्या एका वर्षात दुप्पट होऊ शकतो. कारण पिरामल फार्मा कंपनीचा एपीआय आणि सीजीएस व्यवसाय अधिक विस्तारत आहे. मात्र, कंपनीवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. याशिवाय फार्मा कंपनी Divi देखील चांगली कामगिरी करताना दिसून येईल.

हिरो मोटो

हे वर्ष हिरो मोटोचे असणार आहे. कारण ग्रामीण भागात उत्पन्न आणि दुचाकी वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थित्यंतर दिसून येत आहे. याशिवाय इलेक्ट्रिक व्हीलर्सच्या बाबतीतही हिरोमोटो चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. एकंदरीत, हिरो मोटो एक डार्क हॉर्स म्हणून उदयास येत आहे.

मारुति सुझुकी

मारुति सुझुकी कंपनीच्या स्टाॅक्सबद्दलही शेअर तज्ज्ञ बुलिश आहेत. तर दुसीकडे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बाॅश बद्दलही शेअर तज्ज्ञ उत्साहित आहेत. या दोन्ही कंपन्या सध्या चांगला परफाॅर्मन्स देत आहेत.यापाठोपाठ टाटा मोटर्सचा शेअरही खरेदी करण्याचा सल्ला शेअर तज्ज्ञांनी दिला आहे.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग