Motorola : पाण्यात पडल्यानंतरही काहीच होणार नाही, मोटोरोलाचा वॉटरप्रूफ फोन स्वस्तात लॉन्च!-waterproof and mid budget smartphone motorola edge 50 neo launched in india ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Motorola : पाण्यात पडल्यानंतरही काहीच होणार नाही, मोटोरोलाचा वॉटरप्रूफ फोन स्वस्तात लॉन्च!

Motorola : पाण्यात पडल्यानंतरही काहीच होणार नाही, मोटोरोलाचा वॉटरप्रूफ फोन स्वस्तात लॉन्च!

Sep 16, 2024 06:33 PM IST

Motorola Edge 50 Neo Launched: मिड बजेट स्मार्टफोन मोटोरोला एज 50 निओ भारतात लाँच करण्यात आला आहे. पाच वर्षांच्या ओएस अपडेटसह येणारा मोटोरोलाचा हा पहिलाच फोन आहे.

मोटोरोलाचा वॉटरप्रूफ फोन भारतात लॉन्च
मोटोरोलाचा वॉटरप्रूफ फोन भारतात लॉन्च

Motorola Waterproof Smartphone: मोटोरोलाने आज भारतात एज ५० सीरिजमधील आणखी एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीचा नवा मिड बजेट स्मार्टफोन मोटोरोला एज ५० निओ भारतात लॉन्च करण्यात आला. ५ वर्षांच्या ओएस अपडेटसह येणारा हा मोटोरोलाचा पहिला फोन आहे. एज ५० निओ मिलिटरी ग्रेड एमआयएल- एसटीडी- ८१० एच प्रमाणपत्रासह येते. नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये ३००० निट्स ब्राइटनेस आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.४ इंचाचा सुपर एचडी एलटीपीओ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या एज ५० सीरिजमध्ये मोटो एज ५० अल्ट्रा, मोटो एज ५० फ्यूजन आणि मोटो एज ५० प्रोचा समावेश आहे.

मोटोरोला एज ५० निओ केवळ एका व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये  ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज मिळत आहे. या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली होती. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास १,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. हा स्मार्टफोन नॉटिकल ब्लू, लॅट, ग्रिस्टेल आणि पोइन्सियाना या चार पॅंटोन-प्रमाणित रंगांमध्ये उपलब्ध आहे, सर्व फोन लेदर फिनिशसह येतात. मोटोरोला एज ५० निओचा पहिला सेल २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर सुरू होईल.

मोटोरोला एज ५० निओ: डिस्प्ले

मोटोरोला एज ५० निओमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३००० निट्स पीक ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनसह ६.४ इंचाचा १.५ के (२६७० बाय १२२० पिक्सल) पीओएलईडी एलटीपीओ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 7300 चिपसेटसह येतो.

मोटोरोला एज ५० निओ: कॅमेरा

मोटोरोला एज ५० निओ फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह ५० एमपी सोनी एलवायटीआयए ७०० सी प्रायमरी कॅमेरा, १३ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड / मॅक्रो कॅमेरा आणि मागील बाजूस ३ एक्स ऑप्टिकल झूमसह १० मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी मोटोरोला एज ५० निओमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मोटोरोला एज ५० निओ: बॅटरी आणि सॉफ्टवेअर

नवीन मोटोरोला फोनमध्ये ६८ वॅट वायर्ड फास्ट आणि १५ वॅट वायरलेस चार्जिंगसह ४ हजार ३१० एमएएचची बॅटरी मिळत आहे. एज ५० नियो हॅलो यूआयसह अँड्रॉइड १४ वर चालते. हा फोन मोटोरोलाचा पहिला फोन आहे, ज्यामध्ये युजर्सला पाच वर्षांचे ओएस अपडेट मिळणार आहे.

मोटोरोला एज ५० निओ: फीचर्स

मोटोरोला एज ५० निओला पाणी आणि धूळ वाचण्यासाठी ६८ आयपी रेटिंग दिले आहे. तसेच हा फोन एमआयएल- एसटीडी ८१० एच प्रमाणित आहे. एमआयएल-एसटीडी ८१० एच-सर्टिफिकेशनमुळे फोनला शॉक, धूळ, उच्च तापमान, कमी तापमान, धुक्यापासून संरक्षण मिळेल. मोटोरोला एज ५० निओमध्ये डॉल्बी एटमॉस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह ड्युअल स्पीकर्स मिळत आहेत.

Whats_app_banner
विभाग