मराठी बातम्या  /  Business  /  Waste To Wealth Centre Eyes Rs 1000 Crore Revenue From Selling Scraps

Waste to wealth : भंगार म्हणावं की कुबेराचा खजिना! स्क्रॅप विकून केंद्र सरकारने कमावले ७० कोटी

Scrap HT
Scrap HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Sep 15, 2023 07:25 PM IST

Waste to wealth : केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत ७० कोटी रुपये कमावले आहेत. तर आगामी काळात १००० कोटी रुपये आणखी कमाई होण्याची शक्यता असून त्याद्वारे मोठ्या रक्कमेचा महसूल जमा होईल.

Waste to wealth : केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयाने कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या माध्यमातून ८ महिन्यांत ७० कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. त्याचवेळी, केंद्र सरकारला इतर विभागांच्या माध्यमातून ३१ ऑक्टोबरला पूर्ण होणाऱ्या स्वच्छता अभियानांतर्गत तिसऱ्या टप्प्यात मिळालेल्या भंगाराच्या विक्रीतून १००० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्र सरकार पुढच्या महिन्यात आॅक्टोबरमध्ये स्वच्छता अभियानाच्या तिसऱ्या पर्वाची पूर्तता करत आहे. या अंतर्गत अतिरिक्त १००० कोटी रुपयांचा महसूल सरकारी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

१.३७ लाख साईट्सवर स्क्रॅप गोळा करून ५२० कोटींची कमाई

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग (DARPG) सचिव व्ही श्रीनिवास यांच्या म्हणण्यानुसार, आॅक्टोबर २०२२ मध्ये स्वच्छता अभियान २.० च्या संचालनानंतर आतापर्यंत हे अभियान अंदाजे १.३७ लाख ठिकाणी आयोजित करण्यात आले. यातून जमा झालेल्या भंगाराच्या सामानातून अंदाजे ५२० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. ३१ आॅक्टोबर २०२३ पर्यंत स्क्रॅपमधून १००० कोटी जमा होतील, अशी अपेक्षा आहे.

स्वच्छता मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात किमान ५० लाख फायली काढण्यात आल्या, १७२ लाख चौरस फूट कार्यालयीन जागा रिकामी करण्यात आली आणि ३१.३५ लाख सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विभाग