Share Market : तिमाही निकालानंतर सुस्साट सुटलाय वारी एनर्जीजचा शेअर, किती वाढला पाहा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market : तिमाही निकालानंतर सुस्साट सुटलाय वारी एनर्जीजचा शेअर, किती वाढला पाहा!

Share Market : तिमाही निकालानंतर सुस्साट सुटलाय वारी एनर्जीजचा शेअर, किती वाढला पाहा!

Jan 31, 2025 11:17 AM IST

Waaree Energies Share Price : वारी एनर्जीच्या शेअरमध्ये १४% वाढ झाली, कारण कंपनीने मजबूत तिमाही निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफा ५०७ कोटी रुपये आणि ऑपरेटिंग रेव्हेन्यू ११७% वाढला. सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल्सने महसूल वाढवला.

तिमाही निकालानंतर सुस्साट सुटलाय वारी एनर्जीजचा शेअर, किती वाढला पाहा!
तिमाही निकालानंतर सुस्साट सुटलाय वारी एनर्जीजचा शेअर, किती वाढला पाहा!

Stock Market News : नुतनीकृत ऊर्जा क्षेत्रातील वेगानं वाढणारी कंपनी वारी एनर्जीचा शेअर आज ९ टक्क्यांपेक्षा जास्त वधारला आहे. कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल या तेजीला कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे.

गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीनं तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीच्या महसुलात व नफ्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शेअरच्या किंमतीवर झाला आहे. कंपनीचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. वारी एनर्जीचा शेअर आज एनएसईवर २४३५ रुपयांवर उघडला. आज या शेअरमध्ये ९ टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. 

कसे आहेत तिमाही निकाल?

वारी एनर्जीनं डिसेंबर तिमाहीत ५०७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यात वार्षिक आधारावर २६० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या ऑपरेटिंग रेव्हेन्यूमध्ये ११७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावेळी कंपनीचा महसूल ३४५८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल १५९६ कोटी रुपये होता.

कंपनीचा मुख्य महसूल स्त्रोत सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल आहे. या कालावधीत कंपनीच्या महसुलात १२२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीला या स्त्रोतातून ३१०८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. वर्षभरापूर्वी वारी एनर्जीला याच स्त्रोतातून १,४०२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. 

सोलर मॉड्यूल तयार करण्याची कंपनीची क्षमता ५ गिगावॅट आहे. तर ५.४ गिगावॅट सोलर सेल तयार करण्याची कंपनीची क्षमता आहे.

आयपीओ किंमतीच्या तुलनेत ५९ टक्क्यांनी वाढला भाव

वारी एनर्जीजचा शेअर ऑक्टोबर २०२४ मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाला होता. कंपनीच्या शेअरची आयपीओ किंमत १,५०३ रुपये प्रति शेअर होती. या किंमतीवरून आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत ५९ टक्क्यांनी वाढली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner