Waaree Energies Ltd Share Price : वारी एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये गुरुवारी ८ टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळाली. लिस्टिंगनंतर पहिल्यांदाच कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. वारी एनर्जी लिमिटेडचे शेअर मागील आठ सत्रांमध्ये १५० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत.
बीएसईवर वारी एनर्जीचा शेअर गुरुवारी ३६०४ रुपयांवर खुला झाला. काही काळानंतर बीएसईवर कंपनीचा शेअर ३६१६.१० रुपयांवर पोहोचला. पण यानंतर कंपनीचे शेअर्स पुन्हा घसरू लागले. एका क्षणी हा शेअर ८ टक्क्यांहून अधिक घसरून ३३१५.०५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. या घसरणीनंतरही वारी एनर्जीचे शेअर्स १५०३ रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा बरेच वर ट्रेड करत आहेत.
स्टॉक एक्स्चेंजला ६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले होते की, त्यांना मॉड्यूलचा पुरवठा करायचा आहे. नोव्हेंबर २०२४ पासून त्याचा पुरवठा केला जाईल. लिस्टिंगनंतर कंपनीला मिळालेली ही पहिलीच ऑर्डर आहे. भारताच्या सौर मॉड्यूल निर्यातीत कंपनीचा बाजारातील वाटा ४४ टक्के आहे. काल म्हणजेच ६ नोव्हेंबरला कंपनीचा शेअर ३७४०.७५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता.
एनएसईवर कंपनीची लिस्टिंग २५०० रुपयांवर झाली होती. कंपनीची लिस्टिंग ६६ टक्के प्रीमियमवर करण्यात आली होती. वारी एनर्जीआयपीओचा अप्पर प्राइस बँड १५०३ रुपये होता.
वारी एनर्जीची ५ उत्पादन केंद्रे आहेत. सुरत, तुंब, नंदीग्राम आणि चिखली येथे कंपनीची उत्पादन केंद्रे आहेत. उत्तर प्रदेशात कंपनीचे केंद्र नोएडा आहे. या कंपनीचे मार्केट कॅप ९६६९५.२२ कोटी रुपये आहे.